शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

‘यंग ब्रिगेड’ घेऊन खेळणार साईनाथ स्पोर्टस

By admin | Updated: November 22, 2014 00:14 IST

असा खेळअशी रणनीती

सचिन भोसले - कोल्हापूर --‘फुटबॉल पंढरी’ समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये चांगल्या संघाला क्रीडारसिकांनी नेहमीच दाद दिली आहे. असाच खेळ करणारा संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिले जाते त्या ‘साईनाथ स्पोर्टस्’ने यंदा ‘यंग ब्रिगेड’वर भर दिला आहे. संघाच्या व्यवस्थापनाने हार-जीतपेक्षा क्रीडारसिकांची एक थापही या संघाला उभारी देणारी असल्याची भावना मानून यापूर्वी चांगला खेळ केला आहे. या संघाने यंदा पहिल्या आठमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी नवोदितांना संधी देण्याचे धोरण अवलंबले आहे. संघात १७ ते २२ वयोगटांतील किमान अकरा खेळाडूंचा समावेश केला आहे. दुधाळी येथे अमित पाटील, गौरव माने यांना आपले खेळाडू इतरत्र तालीम संघाकडून फुटबॉल खेळतात, त्यांच्याकरिता आपलाही संघ असावा म्हणून २००६च्या दरम्यान ‘साईनाथ स्पोर्टस् क्लब’ या फुटबॉल क्लबच्या नावाने ‘केएसए’कडे कनिष्ठ गटासाठी नोंदणी केली. २०११-१२ मध्ये ‘केएसए’च्या सर्व कनिष्ठ गटातील स्पर्धा जिंकत वरचे स्थान पटकावत हा संघ ‘ए’ डिव्हीजनमध्ये दाखल झाला. या संघाने अल्पावधीतच ‘साईनाथ’नावाचा दबदबा निर्माण केला. यंदा या संघाने वेळेवर सराव आणि खेळाडू तंदुरुस्त राहण्यासाठी विशेष व्यायाम सुरू केला आहे. ‘पहिल्या आठ’मध्ये येण्यासाठी खेळाडूंकडून संधीचे सोने करण्यासाठी कॉर्नर किक, फ्री कीक आणि शॉर्ट पासिंग यावर जादा भर दिला आहे. संघाचे बलस्थान अर्थात युवा खेळाडू आहेत. त्यांचा स्टॅमिना अनुभवींनाही मागे टाकत आहे. संघातील अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय शालेय व महाविद्यालयीन स्पर्धा गाजविल्या आहेत. त्यामुळे या खेळाडूंकडून स्थान तर अबाधित राखले जाणार आहे. याशिवाय भल्या-भल्या संघांना धूळ चारण्याचा मानसही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे हा संघ जरी कागदावर सॉफ्ट वाटत असला तरी प्रत्यक्ष मैदानावरील कृतीवर भर देणारा आहे. नवोदितांवरच आमची मदारआमच्या संघात महाविद्यालयीन राष्ट्रीय स्तरावर खेळलेले १७ ते २२ वयोगटांतील ताज्या दमाचे खेळाडू आहेत. त्यांच्या स्टॅमिन्याचा उपयोग योग्यरित्या करून संघाची बांधणी केली आहे. अचूक पास, शॉर्ट पासिंग आणि नियंत्रित खेळ या सर्व बाजूंवर संघातील प्रत्येक खेळाडूला लक्ष देण्यास भाग पाडले आहे. समोरच्या संघाची चाल काय आहे, हे जाणून निर्णय घेण्यासाठी शारीरिक श्रमाबरोबरच मानसिक तयारीही करून घेतली आहे. त्यामुळे समोर कितीही दिग्गज संघ असू दे, विजय मात्र आमच्याच संघाचा असणार आहे.- संतोष पोवार, प्रशिक्षक, साईनाथ स्पोर्टस्सर्वाधिक युवा खेळाडूंचा भरणा आमच्या संघात १७ ते २२ वयोगटांतील सर्वाधिक खेळाडू असणारा संघ म्हणून आमच्या संघाकडे पाहिले जाते. मात्र, आमच्या संघातील खेळाडूंच्या सरावातील सातत्यामुळे आम्ही यंदाच्या हंगामात पहिल्या आठमध्ये निश्चितच येऊ. त्यादृष्टीने सर्व अंगांनी आमच्या खेळाडूंची तयारी सुरू आहे. येणाऱ्या काळात आम्ही मैदानावर प्रत्यक्ष कृती करूनच दाखवू.- गौरव माने, संघव्यवस्थापक, साईनाथ स्पोर्टस्स्टार खेळाडूअभिजित चौगले, नीलेश साळोखे, मनोजसिंग अधिकारी (राष्ट्रीय खेळाडू), अश्विन टाक (सोलापूर), शिरीष पाटील (सोलापूर), समीर अष्टेकर, अशिष चव्हाण, रणवीर खालकर, वीरधवल जाधव, निखिल पोवार, ईशांत पोवार.आमचे खेळाडू एफसी पुणे संघाचा आघाडीचा खेळाडू निखिल कदम, डीएसके शिवाजीयन्सचा रोहन आडनाईक, अक्षय शिंदे हे ‘साईनाथ’चे एकेकाळी शिलेदार होते. संघ उभारणीत यांचावाटा महत्त्वाचा फिरोज इनामदार, गौरव माने, अमित पाटील, अर्जुन कदम, मनोज जाधव, धनंजय यादव, सूर्यदीप माने, युवराज कुरणे, सुनील पोवार, संजय गेंजगे, नीलेश साळोखे, रोहित साळोखे, अल्लाबक्ष इनामदार, सचिन जाधव, आदी.