शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

साहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत, सरकारी कार्यालयांतील कामकाज विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 10:36 IST

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह कोणत्याही सरकारी कार्यालयात गेले की ‘साहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत,’ असे आता सर्रास ऐकावयास मिळत आहे. निवडणूक विभागाने काही मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या दिमतीला घेतले असले तरी सरकारी कार्यालयात मात्र जणू काही सर्व विभागच इलेक्शन ड्यूटीला जुंपला असल्याचा आविर्भाव इतर अधिकारी, कर्मचारी दाखवीत आहेत. त्यामुळे काम घेऊन येणाऱ्यांना हात हलवत माघारी परतावे लागत आहे. कामे होत नसल्याने वर्दळही कमी होत असून, या प्रवृत्तीमुळे सरकारी कार्यालयांतील कामकाजही विस्कळीत झाले आहे. ​

ठळक मुद्देसाहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत, सरकारी कार्यालयांतील कामकाज विस्कळीतजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेतील वर्दळ थंडावली

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह कोणत्याही सरकारी कार्यालयात गेले की ‘साहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत,’ असे आता सर्रास ऐकावयास मिळत आहे. निवडणूक विभागाने काही मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या दिमतीला घेतले असले तरी सरकारी कार्यालयात मात्र जणू काही सर्व विभागच इलेक्शन ड्यूटीला जुंपला असल्याचा आविर्भाव इतर अधिकारी, कर्मचारी दाखवीत आहेत. त्यामुळे काम घेऊन येणाऱ्यांना हात हलवत माघारी परतावे लागत आहे. कामे होत नसल्याने वर्दळही कमी होत असून, या प्रवृत्तीमुळे सरकारी कार्यालयांतील कामकाजही विस्कळीत झाले आहे.लोकसभा निवडणुकीसाठी रविवार (दि. १०) पासून आचारसंहिता सुरू झाली आहे. २३ एप्रिलला मतदान होईपर्यंत ती सुरूच राहणार आहे. त्यामुळे अजून दीड महिना सर्वच सरकारी कार्यालयातील हीच अवस्था दिसणार आहे. निवडणूक विभागाने जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ, पोलीस, शिक्षण, सहकार, पाटबंधारे, इत्यादी विभागांतून कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी घेतले आहेत. निवडणूक ड्यूटी लागलेले कर्मचारी एकूण संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या एक चतुर्थांशही नाहीत. तरीही निवडणुकीच्या नावाखाली बरीच सरकारी कार्यालये ओस पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे.निवडणूक कामाचा अनुभव असल्याने महसूल, सहकार, शिक्षण या विभागांतील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या कामासाठी घेतले जाते. सहकारातील जिल्हा उपनिबंधकांसह निम्मे कर्मचारी या कामासाठी घेण्यात आले आहेत; त्यामुळे या कार्यालयातील कामकाज सध्या थंडावले आहे. मार्च एंडिंगची कामे असतानाही निम्मे कर्मचारी नसल्याचा परिणाम कामकाजावर दिसत आहे. हीच परिस्थिती जिल्हा परिषदेत दिसत आहे.

पंचायत समिती व मुख्यालयातील जवळपास १७५ कर्मचारी निवडणुकीसाठी घेतल्याने त्यांच्या कामाचा ताण त्यांच्या विभागातील इतर कर्मचाºयांवर येत असल्याचे दिसत आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून ते पूर्ण प्रशासन सांभाळणारे सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इलेक्शन ड्यूटीवर असल्याने अन्य कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेचे रान मोकळे मिळाले आहे.

दहावी, बारावी वगळून सर्व शिक्षक निवडणूक कामासाठी घेतले असल्याने त्यांना आतापासून शाळा व निवडणुकीच्या कामांसाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे १० एप्रिलच्या आत परीक्षा घेऊन पूर्णवेळ निवडणूक कामाला देण्याचे बंधन शिक्षकांना घालण्यात आले आहे. आचारसंहितेचे कडक पालन करण्यासह उमेदवारी अर्ज भरायला सुरू होण्यापूर्वीची सर्व तयारी या कर्मचाऱ्यांकडून सध्या करवून घेतली जात आहे. अंतिम मतदार यादीनुसार व्होटर स्लिप तयार करणे, मतदारसंघनिहाय मतदारांची माहिती विशेष रकान्यात भरणे, आदी कामे करवून घेतली जात आहेत.

जिल्ह्यातील ६००० कर्मचारी निवडणूक कामातनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने ३९ हजार २८३ कर्मचारी लागतील, असे गृहीत धरून नियोजन केले आहे. त्यांपैकी २९ हजार ८०९ कर्मचारी, अधिकारी उपलब्ध होण्यासारखे आहेत. त्यातही २३ हजार ६८९ कर्मचारी प्रत्यक्ष कामास पात्र ठरत आहे. यातदेखील आजारी, महिला असे निकष लावून त्याप्रमाणे अंतिम यादी तयार करण्यात येत आहे. आजच्या घडीला सहा हजार कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक कामात आहेत. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGovernmentसरकारkolhapurकोल्हापूर