शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

Kolhapur: लेक एसएसपीई या दुर्मिळ आजाराने ग्रस्त, वडिलांनी परदेशातून आणले इंजेक्शन; पुजारी कुटुंबियांची हृदयद्रावक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:33 IST

दुर्वा दळवी कोल्हापूर : वय अवघे सात वर्ष, खेळण्या बागडण्याचा वयात अंथरुणाला खिळली. तिची अवस्था पाहून आईवडील ही हतबल झालेत. ...

दुर्वा दळवीकोल्हापूर : वय अवघे सात वर्ष, खेळण्या बागडण्याचा वयात अंथरुणाला खिळली. तिची अवस्था पाहून आईवडील ही हतबल झालेत. एसएसपीई हा दुर्मिळ आजार तिच्या आयुष्यात आला अन् तिच्यासोबत तिच्या कुटुंबाचे ही जगणे मुश्किल झाले. पण लेकीच्या उपचारासाठी वडिलांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा काळजाला भिडणारी आहे. हातकणंगले तालुक्यातील सागर पुजारी यांच्या मुलीला एसएसपीई (सबएक्यूट स्क्लेरोसिंग पैनेंसेफलाइटिस) हा एक दुर्मिळ आणि गंभीर स्वरूपाचा आजार झाला आहे. पहिलीच्या वर्गात शिकणारी मुलगी जिची हालचाल हळूहळू मंदावत गेली. त्यानंतर तिला अचानक झटके येऊ लागले. आईवडिलांनी तत्काळ उपचारासाठी डॉक्टरकडे नेले. दुर्मिळ आजार असल्याने उपचार होणे ही कठीण. या आजाराची नोंदच नसल्याने इन्शुरन्स कंपन्या ही आर्थिक मदत करत नाहीत. तसेच मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता निधी या योजनेत ही या आजाराची नोंद नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या.लेकीच्या उपचारासाठी पाण्यासारखा पैसा पुजारी कुटुंबीय खर्च करताहेत. वडिलांनी तिच्या उपचारासाठी स्वतःची जमीन विकली. लागेल तेवढा पैसा ते कसाबसा जमा करत आहेत. कोल्हापुरातील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून आजवर तब्बल ९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.सागर पुजारी यांनी मुलीच्या उपचारासाठी रिबावरीन हे इंजेक्शन आणण्यासाठी परदेश गाठला. हे इंजेक्शन भारतात शोधले असता कुठेही उपलब्ध झाले नाही. थायलंडमध्ये हे इंजेक्शन मिळेल अशी माहिती मिळताच त्यांनी थायलंड गाठले. त्यानंतर बँकाँग शहरात या इंजेक्शनचे फक्त चार डोस उपलब्ध होते. परंतु तेथे ही पोलिस परवानगी शिवाय हे इंजेक्शन देता येत नसल्याने चीनमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध असल्याचे समजले. त्यानंतर पुजारी यांच्या मित्राच्या माध्यमातून ते इंजेक्शन थायलंडमध्ये आणण्यात आले. तेथून पुजारी यांनी परिस्थितीला धाडसाने सामोरे जात भारतात हे इंजेक्शन घेऊन आले.या इंजेक्शनचे डोस आता त्यांच्या मुलीला दिले जात आहे. ९० दिवस तिला ह्या उपचारासाठी लागणार असून त्याकरिता तिला रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. उपचार सुरू करून आता दीड महिना झाला आहे. हळूहळू मुलीच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याने तिचे आईवडील समाधान व्यक्त करत आहेत. 

आरोग्यमंत्र्यांनी केले दुर्लक्ष..पुजारी यांच्या मुलीच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. परंतु आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच त्यांच्या मुलीच्या आजाराची दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आरोग्यमंत्री यांची अनेकदा भेट घेतली परंतु त्यांनी निधी कसा उपलब्ध करून देणार अशी प्रतिक्रिया दिल्याचे पुजारी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

एसएसपीई आजार होतो कसा? एसएसपीई हा आजार गोवर विषाणूमुळे होतो. विशेषतः लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये हा आजार आढळतो. ही गोवरच्या विषाणूमुळे होणारी एक दुर्मिळ आणि गंभीर न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. गोवर झाल्यानंतर काही वर्षांनी ही समस्या उद्भवू शकते, जरी व्यक्ती गोवरमधून पूर्णपणे बरी झाली असली तरीही. हा एक आजार इतका गंभीर आहे ज्यात बहुतेक वेळा रुग्णाचा मृत्यू ही होऊ शकतो.

देशातील एसएसपीईवर पहिलाच प्रयोगएसएसपीईचे निदान करण्यासाठी डॉक्टरांकडून विविध चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. या आजारावर उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे उपचारांसाठी अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे. भारतातील आणि कोल्हापुरातील या आजारावर उपचाराचा हा पहिलाच प्रयोग आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर