शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

हनीट्रॅप प्रकरणातील सागर माने गँगला मोका; मोठ्या व्यापाऱ्यांना जाळ्यात ओढून घालायचे गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 12:05 IST

विधी संघर्षीत मुलीस सोशल मीडियावर संपर्क करण्यास सांगून शहरातील सराफ व्यावसायिक व व्यापाऱ्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून लाखो रुपयांना लुटले.

कोल्हापूर : विधी संघर्षीत मुलीस सोशल मीडियावर संपर्क करण्यास सांगून शहरातील सराफ व्यावसायिक व व्यापाऱ्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून लाखो रुपयांना लुटणाऱ्या सागर माने (एस.एम) गँगवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. जुना राजवाडा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली. याप्रकरणी चौघांना शुक्रवारी अटक करण्यात आली असून अन्य दोघे फरार आहेत. एक विधीसंघर्षित बालिका आहे.मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये टोळीचा मुख्य सूत्रधार सागर पांडुरंग माने (रा. कळंबा), सोहेल ऊर्फ अरबाज मुनाफ वाटंगी (रा. जुना वाशी नाका), उमेश श्रीमंत साळुंखे, आकाश मारुती माळी (दोघेही रा. यादवनगर), लुकमान शकील सोलापुरे (सरनाईक वसाहत, जवाहरनगर), सौरभ गणेश चांदणे (म्हाडा काॅलनी, यादवनगर), विजय रामंचद्र गौड (रा. कळंबा), व विधी संघर्षित बालिका यांचा या टोळीत समावेश आहे. या प्रकरणातील फिर्यादीला विधी संघर्षित बालिकेने सोशल मीडियावरून संपर्क साधून भेटण्यास बोलावले. तेथील हॉटेलमध्ये गेल्यानंतर बालिका हॉटेलच्या वॉशरूममधून बाहेर आली. या दरम्यान तिच्या साथीदारांनी त्या ठिकाणी येऊन मोबाईलवरून चित्रीकरण केले. अत्याचार केल्याची फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्याची व बदनामी करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळले. असाच प्रकार या संशयितांनी तीन ते चार जणांबाबतही केला होता. याबाबत तपास करून पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे व अरविंद कांबळे यांच्या पथकाने संशयित आरोपींनी एकूण २८ गुन्हे केले आहेत. हे सर्व संघटितपणे केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे पाठविला. तो त्यांनी पुढे विशेष महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविला. त्यांनी त्याला शुक्रवारी मंजुरी दिली.यातील संशयित साळुंखे,वाटंगी, सोलापूरे, चांदणे हे चारजण लाईन बझार येथे मिळून आले. त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलिसांकडे सुपूर्द केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhoneytrapहनीट्रॅपCrime Newsगुन्हेगारी