शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

हणबर बांधवांच्या एकीमुळे गडहिंग्लजला खळबळ !

By admin | Updated: February 1, 2017 23:53 IST

समाजाची निर्णायक मते : हलकर्णी जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी, भाजपसह हत्तरकी गटाकडे उमेदवारीची मागणी

राम मगदूम--- गडहिंग्लज तालुक्यात १२ हजार आणि एका हलकर्णी गटात तब्बल पाच हजार निर्णायक मतदान असणाऱ्या हणबर समाजाच्या एकीमुळे गडहिंग्लजच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोणत्याही परिस्थितीत हलकर्णी गटाची निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर समाज ठाम असून राष्ट्रवादी, भाजपसह हत्तरकी गटाकडे उमेदवारी मागण्यात आली आहे.रविवारी कर्नाटक-महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समाजाचा मेळावा झाला. त्याच मेळाव्यात समाजातर्फे हलकर्णी जिल्हा परिषदेची निवडणूक एकजुटीने लढविण्याचा निर्धार झाला. तेव्हापासूनच समाजाच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.मंगळवारी (दि. ३१) सुकाणू समितीच्या शिष्टमंडळाने समाजातील प्रमुख गंगाधर व्हसकोटी, चंद्रशेखर पाटील व बी. एस. पाटील या तिघांनाही सोबत घेऊन उमेदवारीची मागणी केली. एखाद्या समाजाने एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची तालुक्यातील ही पहिलीच वेळ आहे.सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षणहलकर्णी गटाची जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. त्यासाठी हत्तरकी गटाकडून व्हसकोटी व चंद्रशेखर पाटील, तर भाजपकडून बी. एस. पाटील हे आपल्या सौभाग्यवतींच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.गडहिंग्लजमध्ये १२,००० मतेहलकर्णी गणातील हलकर्णी, नंदनवाड, कुंबळहाळ, मनवाड, तुप्पूरवाडी, तेरणी, चंदनकूड, बसर्गे व येणेचवंडी या नऊ गावांत मिळून हणबर समाजाची ५,३०० मते आहेत. ९ पैकी ८ गावांचे सरपंच, उपसरपंचपद या समाजाकडेच आहेत. याशिवाय गडहिंग्लज शहर, दुंडगे, हेब्बाळ, निलजी, मुत्नाळ, खणदाळ, माद्याळ, शेंद्री, करंबळी, हेळेवाडी, काळमवाडी, यमेहट्टी व सांबरे या गावातही समाजाचे निर्णायक मतदान आहे.यापूर्वी यांना मिळाली संधी १९७९ मध्ये आण्णाप्पा मणिकेरी यांना पंचायत समितीवर, तर १९९७ मध्ये चंद्रशेखर पाटील व २००७ मध्ये सुधाताई भागोजी गवळी या दोघांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्वाची संधी मिळाली होती.यांच्याकडे मागितली उमेदवारीस्व. हत्तरकी यांचे सुपुत्र सदानंद यांच्याकडे व्हसकोटी यांच्यासाठी, तर राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती राक्षे व तालुकाध्यक्ष हेमंत कोलेकर यांच्याकडे समाजासाठी उमेदवारी मागण्यात आली. मात्र, समाजाचा उमेदवार ठरविण्याचा धिकार सुकाणू समितीने आपल्याकडे ठेवला आहे.हत्तरकी गटाची झाली कोंडीस्व. हत्तरकी यांच्या पश्चात त्यांच्या गटाची सूत्रे व्हसकोटी यांच्याकडे आहेत. विविध उपक्रमांतून त्यांनी गटाला ऊर्जितावस्था आणली असून, त्यांनी पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. मात्र, स्व. हत्तरकी यांच्या पत्नी किंवा त्यांच्या स्नुषा सदानंद यांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी, असे जुन्या कार्यकर्त्यांचे मत आहे. यामुळेच हत्तरकी गटाची कोंडी झाली आहे.