शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
7
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
8
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
9
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
10
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
11
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
12
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
13
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
14
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
15
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
16
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
17
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
18
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
19
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
20
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी

कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या एस. टी. चालक-वाहकांचे परवाने रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 10:55 IST

एस. टी. महामंडळातील चालक आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. जे कर्मचारी तत्काळ कर्तव्यावर हजर राहणार नाहीत. त्यांच्यावर मोटार वाहन कायदा १९८८ ला अधिन राहून चालकांचे परवाने व वाहकांचे बॅज रद्द करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार दिला.

ठळक मुद्देप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच इशारा नागरिकांच्या गैरसोयीबद्दल होणार कारवाईएसटी कर्मचाऱ्यांचा संप गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार

कोल्हापूर, दि. १९ : एस. टी. महामंडळातील चालक आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. जे कर्मचारी तत्काळ कर्तव्यावर हजर राहणार नाहीत. त्यांच्यावर मोटार वाहन कायदा १९८८ ला अधिन राहून एस. टी. चालकांचे परवाने व वाहकांचे बॅज रद्द करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार दिला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर परिवहन मंत्र्यांसोबत बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळसणात सलग तिसऱ्या दिवशी सर्वसामान्य जनतेचे हाल होणार आहेत.

तिन दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे एस. टी. महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या  प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद आदी ठिकाणांहून आलेल्या प्रवाशांच्या पुढील प्रवासाकरीता खासगी बसेस, टेम्पो, ट्रॅक्स व्यावसायिकांचे साहाय्य घेण्यात आले आहे.

ही यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे मोटार वाहन कायद्यानुसार एस. टी. महामंडळाची बससेवाही त्यात मोडते. त्यामुळे या कायद्यानुसार महामंडळाचे जे चालक, वाहक तत्काळ कामावर रूजू होणार नाहीत. त्याच्यावर लायसेन्स (परवाने), कंडक्टर बॅज रद्द करण्याची तरतूद आहे. त्यानुसार त्याचा वापर केला जाणार आहे.

सद्य:स्थितीत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक गोपाळे यांच्या नेतृत्वाखाली महामंडळास सहाय करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यात कोल्हापूर-करवीर- मुबारक उचगांवर, प्रशांत जाधव, गडहिंग्लज- चंदगड- हृषीकेश कोराणे, अमित गुरव, शिरोळ -हातकणंगले- सुरेश माळी , मलकापूर, शाहूवाडी- पन्हाळा- जितेंद्र पाटील, आजरा-गारगोटी - अमर भंडारे, अश्विनी कुमार , राधानगरी - गगनबावडा - सागर विश्वासराव, सुनील राजमाने, कागल - रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. त्या त्या डेपो नियंत्रकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे डॉ. पवार यांनी आवाहन केले आहे.

के.एम.टी.लाही जिल्हाभरात प्रवासी ने-आण मुभा

एस. टी. महामंडळाच्या चालक, वाहकांच्या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महापालिकेच्या के.एम.टी. उपक्रमातील बसेसना २० किलोमीटरच्या परिघापासून पुढे जाण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार जिल्हाभरात कुठेही प्रवासी ने-आण करण्याची मुभा दिली आहे. यासह खासगी बसेस, शालेय बसेस, कंपनी मालकीचे बसेस यांनाही बसस्थानकातून तात्पुुरती प्रवासी वाहतूक करण्याची मुभा दिली आहे, असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.

प्रधान सचिवांचेही व्हीसीद्वारे आदेश

प्रवाशांच्या सुविधेसाठी जिल्ह्यातील खासगी व सार्वजनिक वाहतूक वाहनांमधून जास्तीत जास्त प्रवाशांची सोय करावी. त्यात महामंडळ व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यात समन्वय साधून करावे. यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अनुषंगिक नियम कलम ३०, ३३, ३४ व ४१ अन्वये कार्यवाही करण्यात यावी, असे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्याचे प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व अन्य अधिकाºयांना निर्देश दिले.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळ