शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
2
काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा
3
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू
4
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
5
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
6
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
7
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?
8
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
9
पावसाचं आगमन अन् भारतीय कर्णधाराची तारांबळ; रोहित-द्रविडचा मजेशीर VIDEO
10
Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती
11
इंग्लंडमध्ये तरूणीने पाकिस्तानच्या शादाबची लाज काढली; एका वाक्यातच बोलती बंद
12
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
13
4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!
14
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
15
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
16
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
17
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
18
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
19
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
20
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

एस. टी.चे शासनात विलिनीकरण करा, अन्यथा तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 5:59 PM

state transport Kolhapurnews-कोरोनामुळे एस. टी. महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत बनली आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा निर्णय लवकर घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी शुक्रवारी दिला.

ठळक मुद्देएस. टी.चे शासनात विलिनीकरण करा, अन्यथा तीव्र आंदोलनकर्मचारी काँग्रेस संघटनेचा विभागीय मेळाव्यात श्रीरंग बरगे यांचा इशारा

कोल्हापूर : कोरोनामुळे एस. टी. महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत बनली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ अशक्य आहे. त्यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणून या महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, अशी संघटनेची मागणी आहे. विलिनीकरणाचा निर्णय लवकर घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी शुक्रवारी दिला.महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते. विलिनीकरणाचा प्रयोग इतर राज्यात यशस्वी झाला असून, आपल्या राज्यात तो होण्यासाठी परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी प्रयत्न करावेत.

एस. टी.तील काही काँग्रेसच्या संघटना स्वार्थासाठी सरकार विरोधात असंतोष पसरवत आहेत. त्यांच्यावर पक्षाने कठोर कारवाई करण्याची मागणी बरगे यांनी केली. एस. टी.ला उर्जितावस्थेत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कर्मचारी संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.

या मेळाव्यात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते बी. डी. शिंदे, राजेंद्र पाटील, मियालाल पटवेगार, हिंदुराव कुंभार, संजय कांबळे, ए. बी. माने, संजय पोवार-वाईकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते बबनराव थोरात, ए. आर. पाटील, परवीन पठाण, बी. आर. साळोखे, सुनील फल्ले, एस. वाय. पोवार, अय्याज चौगुले, ए. ए. गवंडी, अनिता पाटील, वैशाली पिंगळे, गजानन विचारे आदी उपस्थित होते. संघटनेचे विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी प्रास्तविक केले. रावण समुद्रे यांनी सूत्रसंचालन केले. संजय सासने यांनी आभार मानले.श्रीरंग बरगे म्हणाले की, महामंडळाचा संचित तोटा सध्या साडेसहा हजार कोटी आहे. महामंडळ उर्जितावस्थेत आणण्यासाठी परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील आणि महामंडळाचे एमडी. शेखर चन्ने यांचे नियोजनबद्ध काम असून, मंत्री पाटील व एमडी चन्ने यांना विभागीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे. 

 

टॅग्स :state transportएसटीkolhapurकोल्हापूर