शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीचा हंगाम कॅश करण्यासाठी एस. टी. सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 16:43 IST

satetransport, diwali, kolhapurnews लॉकडाऊनमुळे आर्थिक खाईत लोटलेल्या एस. टी.च्या सर्व आशा आता दिवाळी हंगामावर आहेत. ११ ते २२ नोव्हेंबर हा गर्दीचा आणि हमखास पैसे मिळवून देणारा हंगाम कॅश करण्यासाठी एस.टी पूर्ण ताकदीने पुढे सरसावली आहे. आगारनिहाय जादा गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे ११ ते २२ नोव्हेंबर काळात जादा गाड्यांचे नियोजन मुंबई, पुण्यातून येण्यासाठी जास्त गाड्या

कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे आर्थिक खाईत लोटलेल्या एस. टी.च्या सर्व आशा आता दिवाळी हंगामावर आहेत. ११ ते २२ नोव्हेंबर हा गर्दीचा आणि हमखास पैसे मिळवून देणारा हंगाम कॅश करण्यासाठी एस.टी पूर्ण ताकदीने पुढे सरसावली आहे. आगारनिहाय जादा गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे. मुंबई, पुण्यातून कोल्हापुरात आणण्यासाठी २२० जादा गाड्यांची सोय करून दिली आहे, तर कोल्हापुरातून बाहेर जाणाऱ्यांसाठी अतिरिक्त १० गाड्या दिमतीला ठेवण्यात आल्या आहेत. गर्दी पाहून आणखी फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या एस. टी. ला बसला आहे. एकट्या कोल्हापूर विभागाचा विचार केला तर अजूनही निम्म्या गाड्या डेपोत थांबून तर निम्म्याच रस्त्यावर धावत आहेत. दिवाळी हा एस.टी.साठी कायमच भरघोस उत्पन्न मिळवून देणारा सण ठरतो. दरवर्षी हंगामी दरवाढीसह जादा गाड्यांचे नियोजन केले जाते, पण यावर्षी हंगामी वाढ न करता दुरावलेल्या प्रवाशांना पुन्हा एकदा एस.टी.कडे आणण्याचे धोरण ठेवण्यात आले आहे.

एकट्या कोल्हापूर विभागाने मुंबईतून येणाऱ्यांसाठी २० जादा गाड्या सोडल्या आहेत, तर पुण्यातून कोल्हापूरकडे येण्यासाठी २०० गाड्यांची सोय केली आहे. कोल्हापुरात खासगी वाहनाने आल्यानंतर बेळगाव, गोवा, कोकणासह जिल्ह्यातील मोठ्या शहरांकडे जाण्यासाठीही १० विशेष गाड्यांची सोय केली आहे.कोणत्याही दरवाढीशिवाय आणि सुरक्षित प्रवास म्हणून एस.टीचा लौकीक आहे. आजवर एस.टीने एक प्रवासी असतानाही त्याला सुरक्षित पोहोचविण्याची सामाजिक बांधीलकी जपली, आता एस. टी. ला गरज असल्याने जास्तीत जास्त प्रवाशांनी एस. टी. ने प्रवास करून महाराष्ट्राच्या या जीवनदायिनीला गतवैभव मिळवून देण्याची गरज आहे.

  • मुंबईतून येण्याासाठी : ११ ते २२ नोव्हेंबर
  • पुण्यातून येण्यासाठी : ११ ते १३ नोव्हेंबर
  • कोल्हापुरातून जाण्यासाठी : ११ ते १४ नोव्हेबर

 

सध्या कोल्हापुरातील १२ आगारांत ४०० एस. टी. गाड्या रस्त्यावर धावत आहेत.कोरोनाच्या काळात पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झाली असली तरी खबरदारी म्हणून सॅनिटायझरचा वापर, नो मास्क नो एन्ट्री हे धोरण कायम आहे. एस. टी. तही त्याचे तंतोतत पालन होते. सुरक्षित प्रवास म्हणून एस.टीची निवड करावी.अतुल मोरे, सहाय्यक वाहतूक अधिकारी , कोल्हापूर विभाग

टॅग्स :state transportएसटीDiwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर