शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : पर्यावरणपूरक कोल्हापूरची साद देत ऋतुराज पाटील यांनी भरला अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 14:57 IST

काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारी अर्ज गुरुवारी सायकल रॅली काढून साधेपणाने भरला. या रॅलीद्वारे त्यांनी पर्यावरणपूरक आणि सदृढ कोल्हापूर करण्याबाबतची साद दिली. त्यामध्ये युवक, काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे ऋतुराज हे पुतणे आहेत. त्यांची या निवडणुकीत भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्यासमवेत लढत होणार आहे.

ठळक मुद्देपर्यावरणपूरक कोल्हापूरची साद देत ऋतुराज पाटील यांनी भरला अर्जसायकल रॅलीत युवक, कार्यकर्त्यांचा सहभाग

कोल्हापूर : काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारी अर्ज गुरुवारी सायकल रॅली काढून साधेपणाने भरला. या रॅलीद्वारे त्यांनी पर्यावरणपूरक आणि सदृढ कोल्हापूर करण्याबाबतची साद दिली. त्यामध्ये युवक, काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे ऋतुराज हे पुतणे आहेत. त्यांची या निवडणुकीत भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्यासमवेत लढत होणार आहे.येथील दसरा चौकात उभारलेल्या व्यासपीठावर शाहीर दिलीप सावंत यांनी भाजप सरकारच्या विरोधातील पोवाडा सादर केला. त्यानंतर ऋतुराज पाटील यांनी कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन केले. त्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय. डी. पाटील, प्रतिमा सतेज पाटील, उपमहापौर भूपाल शेटे, सुरेश कुऱ्हाडे, शारंगधर देशमुख, बबनराव रानगे, सरलाताई पाटील, सागर चव्हाण, आदी उपस्थित होते.

साडेअकराच्या सुमारास सायकल रॅली सुरु झाली. त्यात चालत देखील कार्यकर्ते सहभागी झाले. व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोड, उद्योगभवन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅली आली. तेथून ऋतुराज यांनी आमदार पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे अर्ज सादर केला. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेसkolhapur-north-acकोल्हापूर उत्तरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील