शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिकेसाठीची धावपळ थांबली

By admin | Updated: March 19, 2016 00:26 IST

शिवाजी विद्यापीठ : ‘एसआरपीडी’ तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई करा

संतोष मिठारी - कोल्हापूर परीक्षा प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या प्रश्नपत्रिका वितरणाबाबत शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ‘सिक्युरड रिमोट पेपर डिलिव्हरी’ (एसआरपीडी) म्हणजे गोपनीय व नियंत्रित पद्धतीने प्रश्नपत्रिकेचे वितरण पद्धतीद्वारे तंत्रज्ञान वापराच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यामुळे परीक्षा विभागाची प्रश्नपत्रिका वितरणातील धावपळ थांबणार आहे. परीक्षेच्या सध्याच्या सत्रातील १८ अभ्यासक्रमांच्या सुमारे दोन हजार प्रश्नपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. वितरणातील धावपळ थांबविण्यासाठी परीक्षा विभागाने प्रायोगिक तत्त्वावर एप्रिल २०१५ मधील परीक्षेवेळी अभियांत्रिकीतील काही व औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी एसआरपीडी वापरले. त्यातील यशस्वितेनंतर आता १८ अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकांच्या वितरणासाठी त्याचा वापर होत आहे. त्यातून या प्रक्रियेतील गोपनीय व नियंत्रण वाढविण्यास मदत होणार आहे. सर्व अभ्यासक्रमांसाठी टप्प्याटप्प्याने याचा वापर होणार आहे. प्रश्नपत्रिका क्षणात मिळतेएसआरपीडी प्रक्रियेअंर्तगत परराज्यातील गोपनीय प्रेसमध्ये सांकेतिक स्वरूपात प्रश्नपत्रिकेचे टंकलेखन (टायपिंग) केले जाते. तेथून ती थेट विद्यापीठाच्या वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिली जाते. एसआरपीडीमध्ये महाविद्यालयांच्या प्राचार्यांना एक युजर आयडी आणि पासवर्ड दिला आहे. त्याची लिंक विद्यापीठाच्या वेबपोर्टलशी जोडली आहे. पेपरच्या दोन तास आधी वेबपोर्टलवरील सांकेतिक (कोडिंग) स्वरूपातील संबंधित प्रश्नपत्रिका प्राचार्यांनी ‘डाऊनलोड’ करून घ्यायची. त्यानंतर पेपरच्या अर्धा तासापूर्वी संबंधित प्रश्नपत्रिका विसांकेतिक (डिकोडिंग) करण्याचा पासवर्ड पाठविला जातो. त्यानंतर १५ मिनिटांनी प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्याच्या छायांकित प्रती काढून त्या विद्यार्थ्यांना दिली जाते. या पद्धतीमुळे प्रश्नपत्रिका क्षणात व सुरक्षित परीक्षा केंद्रांवर उपलब्ध होत आहे.छपाई खर्च, वेळेची बचतजुन्या पद्धतीनुसार प्रश्नपत्रिकांची छपाई विद्यापीठाच्या प्रेसमध्ये करून त्या परीक्षा केंद्रावर वितरीत केल्या जातात. त्यात छपाई, पॅकिंगसाठी खर्च होतो. दोन दिवस आधी प्रश्नपत्रिका केंद्रांवर पाठवाव्या लागतात. ते टाळण्यासह कागदाच्या कमी वापराबाबत कुलपती आणि राजेश अगरवाल समितीच्या निर्देशानुसार एसआरपीडीचा वापर केला जात असल्याचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी सांगितले. ते म्हणाले, एसआरपीडीमुळे अनावश्यक खर्च आणि वेळेची बचत होणार आहे. विद्यापीठातर्फे प्रत्येक सत्रात विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे सहा हजार प्रश्नपत्रिकांचे वितरण केले जाते. त्यातील दोन हजार प्रश्नपत्रिकांचे एसआरपीडीद्वारे पहिल्या टप्प्यात वितरण केले जाणार आहे. त्यानंतर त्याची व्याप्ती वाढविली जाईल.विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई करायुवक काँग्रेसची मागणी : परीक्षेबाबत शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदनकोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या गलथान कारभारामुळे अभियांत्रिकी व एलएल.बी. परीक्षांचे निकाल उशिरा लागलेले आहेत. त्याचबरोबर फोटो कॉपीची मागणी केलेल्या दहा हजार विद्यार्थी हेलपाटे मारून थकले आहेत, विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करा, अशी मागणी शहर युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष दीपक थोरात यांनी शुक्रवारी कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडे केली. अभियांत्रिकी विभागाचा पहिल्या सत्राचा निकाल दि. ८ जानेवारी ते १६ फेबु्रवारी या कालावधीत जाहीर झाला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका आढळून आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी रीतसर फोटो कॉपीची मागणी केली, वीस हजार विद्यार्थ्यांनी अशी मागणी केली असताना अद्याप दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या कॉपी मिळालेल्या नाहीत. विद्यापीठातील काही कर्मचारी व परीक्षा विभाग यांच्यामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत धुसफुसीमुळेच परीक्षा विभागाचे गणित बिघडल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. परीक्षा नियंत्रकांना पत्रकारांचे वावडे का?गेले आठवड्यात याबाबत परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्याकडे विद्यार्थ्यांची व्यथा मांडण्यासाठी गेलो. त्यावेळी पत्रकार उपस्थित असल्याने त्यांनी आमचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. नियंत्रकांना पत्रकारांचे वावडे का? अशी विचारणा थोरात यांनी केली.