शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सत्तारूढ गटाची डोकेदुखी वाढणार

By admin | Updated: November 4, 2014 00:43 IST

‘गोकुळ’ निवडणूक : मतदार यादी; विरोधक एकवटणार; जुन्या मतदार यादीचा निर्णय न्यायप्रविष्ट

राजाराम लोंढे - कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)ची आगामी निवडणूक नवीन मतदार यादीनेच होण्याची दाट शक्यता आहे. ‘गोकुळ’ची मतदार यादी तयार करून दोन वर्षे होऊन गेल्याने नवीन सहकार कायद्यानुसार ही यादी अद्ययावत करावी लागणार आहे; पण जुन्या मतदार यादीबाबत न्यायालयात दोन याचिका प्रलंबित असल्याने न्यायालय काय निकाल देते, यावर मतदार यादीचे भवितव्य राहणार आहे. ‘गोकुळ’च्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत नोव्हेंबर २०१२ मध्येच संपली आहे. जिल्हा प्रशासनाने जुलै २०१२ पासूनच संघाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. प्राथमिक मतदार यादी, त्यावरील हरकती व अंतिम मतदार याद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत; पण गेलीदोन वर्षे राजकीय मंडळींनी सोयीसाठी वेगवेगळी कारणे पुढे करत संघाची निवडणूक लांबणीवर टाकली. आता प्राधिकरणाच्यावतीने पात्र संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी मुदत संपल्याने येत्या महिन्याभरात ‘गोकुळ’च्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. संघाची कच्ची मतदार यादी, त्यावरील हरकती व पक्की मतदार यादी तयार झाली आहे. त्यामुळे थेट निवडणुकीचा कार्यक्रमच घोषित होईल, असे अनेकांना वाटत आहे; पण तसे होण्याची शक्यता कमी आहे. नवीन सहकार कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत तयार झालेली यादी ग्राह्य मानली जाते. दोन वर्षांपूर्वी यादी तयार करण्यात आल्याने निश्चितच नव्याने यादीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. दोन वर्षांपूर्वी ठराव गोळा करताना इच्छुकांच्या नाकात दम आला होता. एक ठराव ‘लाख’मोलाचा झाला होता. त्यात त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. राष्ट्रवादी कॉँग्रेसची मंडळी हमीदवाडा साखर कारखान्याच्या निवडणुकीत गुंतली होती. त्यामुळे ठराव गोळा करण्यात राष्ट्रवादी मागे होती. दोन वर्षांत सर्वच समीकरणे बदलल्याने आगामी निवडणुकीत वेगळीच समीकरणे उदयास येणार आहेत. नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा निर्णय झाला तर पुन्हा ठरावधारकांचा ‘भाव’ वधारणार असल्याने इच्छुकांची पुन्हा दमछाक होणार. त्याचबरोबर ‘गोकुळ’मधील सत्तारूढ गटाचे नेते आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांचे विरोधक एकवटणार, हे निश्चित आहे. विरोधक ताकदीने उतरले तर ठरावाचा भाव आणखी वधारणार असल्याने सत्तारूढ मंडळींची डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान, जुनी मतदार यादी पात्र-अपात्रतेबाबत न्यायालयात दोन याचिका दोन वर्षांपूर्वी दाखल झाल्या आहेत. या याचिकेवर न्यायालय काय निकाल देते, त्यावरच मतदार यादीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका या नवीन पोटनियमानुसार होणार आहेत. क्रियाशील, अक्रियाशील सभासदांचा निकष लावला जाणार नाही; परंतु मतदार यादी नव्यानेच तयार करावी लागणार. ‘गोकुळ’ची जुनी मतदार यादी न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाचा निकाल काय लागतो, यावरच नवीन की जुन्या मतदार यादीचा निर्णय अवलंबून आहे. - मधुकर चौधरी (आयुक्त, निवडणूक प्राधिकरण)‘पिशवी’तील संस्थांना शेवटची संधी!नवीन सहकार कायद्यानुसार क्रियाशील संस्थाच मतदानास पात्र ठरू शकतात. हा निकष लावला तर ‘गोकुळ’शी संलग्न सुमारे १५०० कागदोपत्री (पिशवीतील) दूध संस्था मतदानास पात्र ठरू शकत नाहीत; पण नवीन कायदा १४ फेबु्रवारीपासून लागू झाल्याने मागील पाच वर्षांत ते क्रियाशील नव्हते, असे म्हणता येत नसल्याने अशा संस्थांना मतदानाची शेवटची संधी मिळणार आहे.