शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात महापुराचा रुद्रावतार, ९५  बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 18:28 IST

मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला असून, सोमवारी सहा तालुक्यांतील शेकडो गावांच्या वेशी ओलांडून महापुराच्या पाण्याने थेट गावांनाच विळखा घातला. शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी तालुक्यांतील काही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  ४८. ५ असून एकूण ९५  बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजना ६ आणि ७ ऑगस्ट रोजीही शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे . 

ठळक मुद्देकोल्हापूरात महापुराचा रुद्रावतार, अनेक गावांना बेटांचे स्वरूपपाच हजार व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश

कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला असून, सोमवारी सहा तालुक्यांतील शेकडो गावांच्या वेशी ओलांडून महापुराच्या पाण्याने थेट गावांनाच विळखा घातला. शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी तालुक्यांतील काही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  ४८. ५ असून एकूण ९५  बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजना ६ आणि ७ ऑगस्ट रोजीही शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे . 

ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढताना जिल्हा प्रशासनासह स्वयंसेवी संघटना कार्यकर्त्यांची पुरती दमछाक झाली. महापुरामुळे सामान्यांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. अनेक गावांतील विद्युत पुरवठा बंद होऊन त्यांचा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला. महापुराचा फटका बसलेल्या पाच हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर शहरातील नदीकाठच्या नागरी वस्तीत तीन ते चार फुटांनी पाणी शिरल्यामुळे रविवारी (दि. ४) रात्री १0 वाजल्यापासून शहरवासीयांची प्रचंड तारांबळ उडाली. महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुमारे २00 हून अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले.

नजिकच्या शाळा, हॉलमधून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापुराचा मोठा फटका शहर पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. सोमवारी दुपारपासून संपूर्ण यंत्रणा पाण्यात बुडाल्याने पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. ऐन पावसाळ्यात कोल्हापूरवासीयांना ‘पाणीबाणी’ला सामोरे जावे लागणार आहे.संपूर्ण जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. शनिवार (दि. ३)पर्यंत जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत फारशी काळजी वाटत नव्हती; परंतु कोयना, कृष्णा, वारणा आणि पंचगंगा अशा चार प्रमुख नद्यांना एकाच वेळी महापूर आला असल्याने पाण्याची फूग सुद्धा वाढत चालली आहे. त्याचा परिणाम म्हणून नदीकाठच्या अनेक गावांत तसेच कोल्हापूर शहरातील नागरी वस्तीत पाणी शिरले; त्यामुळे सर्वांच्याच छातीचे ठोके चुकले आहेत.  पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुरचे पाणी आहे.

 कोल्हापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग वगळता अन्य चोहोबाजंूचे प्रमुख रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले आहेत; त्यामुळे जिल्ह्यातील सर्व राज्य मार्ग तसेच तालुक्यातील जिल्हामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. जिल्ह्यातील दळणवळणाची यंत्रणा विस्कळीत होण्याबरोबरच शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. गावागावांतील संपर्कही तुटला आहे. काही गावांतील विद्युत पुरवठा बंद असून, तेथे काळोख पसरला आहे.शिरोळ तालुक्यातील बस्तवाड, कोथळी, कुरुंदवाड; हातकणंगले तालुक्यातील रुकडी, माणगाव, इंगळी या गावांना बेटाचे स्वरूप आले असून, तेथील ग्रामस्थांना होडी, रबरी बोटीच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, आदी सहा तालुक्यांतील पाच हजारांहून अधिक व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पन्हाळा, वाडीरत्नागिरी, मसाई पठाराकडे जाणारे प्रमुख रस्ते खचले असून, या मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे. रस्ते खचण्याच्या, घराच्या भिंती पडण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.राधानगरी धरण भरून सातही स्वयंचलित दरवाजे उघडले असून, धरणातून ११,४०० क्युसेक पाणी बाहेर फेकले जात आहे. तुळशी नदीवरील तुळशी धरणही सोमवारी पूर्ण क्षमतेने भरले. सकाळी साडेआठ वाजता एक हजार क्युसेक पाणी धरणातून बाहेर पडत होते. दूधगंगा धरणातील वक्राकार दरवाजातून पाणी सोडण्यात येत असून, या धरणातील सात हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

कोल्हापुरात प्रमुख बंद अलेले रस्ते1.व्हीनस काॅर्नर 2.फोर्ड काॅर्नर3.जयंती नदी4.कलेकटर आॅफिस चौक5.बंसत -बहार रोड, पाटलाचा वाडा6.बावडा- शिये7.कोल्हापुर- पन्हाळा8.कोल्हापुर-सांगली बायपास9.पंचगंगा स्मशानभुमी-जुना बुधवार10.कुंभार गल्ली11.लक्ष्मीपुरी12. शाहुपूरी13. सिद्धार्थनगर 14.पंचगंगा तालीम 15.लक्षतीर्थ16.मस्कुती तलाव17.परीख  पुल

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर