कळे : येथील धर्मराज दूध संस्थेच्या वार्षिक सभेत गोकुळ डेअरीच्या ठरावावरून वातावरण तापले. गोकुळच्या ठरावाला लिलाव पद्धतीने सभासदांच्या नावावर करण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून धक्काबुक्की होऊन गोंधळ उडाला.मालुबाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. सचिव भगवान देसाई विषय मांडत असताना प्रश्नोत्तरांतून वातावरण आधीच वादग्रस्त झाले होते. संचालक सुभाष मोळे उत्तर देऊ लागले असता, ‘अध्यक्ष, सदस्य किंवा सचिव यांच्याशिवाय कोणी उत्तर द्यायचे नाही,’ असे भरत इंजुळकर यांनी सांगितले.गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरावाचे महत्त्व वाढले होते. भरत इंजुळकर यांनी ‘गोकुळ’चा ठराव लिलाव पद्धतीने काढून मिळणारे पैसे सभासदांना वाटावेत,’ अशी मागणी करत एक लाखाची बोली लावली. यावर जितेंद्र देसाई यांनी ‘पाच लाख दे, ठराव तुझाच’ असे प्रत्युत्तर दिले. वाद सुरू असतानाच बाळू देसाई यांनी ‘सभा बरखास्त’ अशी घोषणा केली. त्यावरून गोंधळ उडाला.
Kolhapur: ‘गोकुळ’च्या ठरावावरून धर्मराज दूध संस्थेच्या सभेत राडा, धक्काबुक्कीमुळे गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 11:29 IST