शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पसंतीच्या क्रमांकातून ‘आरटीओ’ मालामाल

By admin | Updated: June 17, 2017 00:55 IST

कोल्हापूर प्रादेशिक परिवहनची कामगिरी : वर्षभरात १६ कोटी २६ लाख झाले जमा

सचिन भोसले । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गाडी दुचाकी वा चारचाकी असो त्याला क्रमांक हवा पसंतीचाच. मग त्यासाठी जादा पैसे मोजायला लागले तरी बेहत्तर असे म्हणणाऱ्यांची संख्या दिवसें-दिवस वाढू लागली आहे. अशा हव्या त्या क्रमांकासाठी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराड येथील १९ हजार ६२७ वाहनधारकांनी यंदाच्या वर्षात १६ कोटी २६ लाख रुपये मोजले आहेत. विशेष म्हणजे १, ११११, २२२२, १२३४, १२३, ९,९९९९, ९२९२, ११५५, ७४७४, ६१८, १०, १००, १०००, ४०००, अशा एक ना अनेक पसंतीच्या क्रमांकांना अनेकांनी कधी लिलावाद्वारे तर कधी ठरविलेल्या शुल्कापेक्षा जादा पैसे मोजले आहेत. दसरा, दिवाळी पाडवा, गुढीपाडवा, अक्षयतृतीया, गुरूपुष्यामृत अशा मुहूर्तावर अनेक नागरिक वाहन, सोने, गृहखरेदी करत असतात. त्यात जादा करून वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते.मग वाहन म्हटले की लकी क्रमांक हवा, मग त्यात कुणाचा ९, तर कुणाचा ५, ७, ११, तर कुणाला ७८९, ७८६ हवा असतो. मग त्यासाठीच अनेकजण ३ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत शुल्क भरण्यास राजी होतात. अनेकजणांना पूर्वीच्या गाडीचा क्रमांक हवा म्हणून वाहनधारक नवीन गाडी घेताना तोच क्रमांक पाहिजे म्हणून जादा पैसे मोजतात तर अंकशास्त्रज्ञांनी तुम्हाला अमूक एक क्रमांकच शुभ आहे आणि तोच क्रमांकही घ्या, असा सल्ला देतात तर कोणाला जन्मतारीख, तर कोणाला पत्नीच्या जन्मतारखेचीच बेरीज हवी असते. यासह अनेकांना ‘दादा’, ‘बॉस’, ‘राज’, ‘राम’, अशा एक ना अनेक नावे तयार होणारी नंबरातून अक्षरे हवी असतात म्हणून अमूक एक क्रमांकच हवा म्हणून अनेक वाहनप्रेमी आगाऊ सिरीज सुरू होण्यापूर्वीच ‘जंपिंग’ करून प्रसंगी जादा शुल्क भरून असे हवे ते पसंतीचे क्रमांक घेतात. अशा या क्रमांकांच्या प्रेमापोटी अनेकांनी गाडीच्या किमतीएवढे जवळपास पैसे भरल्याची उदाहरणे आहेत. अशा या क्रमांकाच्या प्रेमापायी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय मालामाल अर्थात महसुलात वाढ होत आहे. यंदा तर केवळ १ एप्रिल २०१६ ते ३१ मे २०१७ अखेर १६ कोटी २६ लाखांचा महसूल कार्यालयाकडे जमा झाला आहे. यंदा तर त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा कार्यालयाला आहे. चर्चा पाच कोटींच्या कारची!गेल्या महिनाभरात कोल्हापूर प्रादेशिक परिवहनकडे ‘रोल्स राईस’ ही महागडी ५ कोटी रुपये किमतीच्या गाडीची नोंदणी झाली असून गाडीमालकाने करापोटी सुमारे १ कोटी रुपये ‘प्रादेशिक’कडे भरले आहेत, तर परदेशी बनावटीची ‘बीएमडब्ल्यू’ ही महागडी ३० लाख रुपये किमतीच्या दुचाकीचीही नोंदणी झाली आहे. या दुचाकीच्या करापोटीही सुमारे ६ लाख रुपये ‘प्रादेशिक’कडे वाहनमालकाने भरले आहेत. या दोन महागड्या गाडीची नोंदणी होऊन बरेच दिवस उलटले तरी या गाडीची चर्चा मात्र अजून जिल्ह्यात सुरुच आहे.