विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांना संधी देण्यासाठी आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचे आविष्कार प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे अनुभवण्यासाठी एआयसीटीईने आयडिया लॅब ही संकल्पना मांडली. लॅबचा प्रस्ताव एआयसीटीईला पाठविण्यासाठी ५५ लाखांचा निधी उद्योगजगतातून उभा करणे बंधनकारक आहे. त्यानंतर तितकीच रक्कम एआयसीटीईकडून या लॅबसाठी दिली जाणार आहे. या नियमानुसार केआयटीने विविध उद्योजक, कंपन्यांना प्रायोजकत्व स्वीकारण्याचे आवाहन केले होते. त्याला अनेक कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यातून एक कोटी रुपयांचा निधी उभा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होत आहे. त्यातील मयुरा स्टील्सने शीषर्क प्रायोजकत्व स्वीकारल्यामुळे ही लॅब ‘मयुरा आयडिया लॅब’ म्हणून ओळखली जाईल, असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. यावेळी केआयटीचे उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले, विश्वस्त सचिन मेनन, साजिद हुदली, संचालक डॉ. विलास कार्जिन्नी, शिवलिंग पिसे, सुभाष माने उपस्थित होते.
चौकट
लॅबच्या माध्यमातून विविध उपक्रम
एआयसीटीई देशातील गुणवत्ताधारक शंभर महाविद्यालयांना या लॅबची मान्यता देणार आहे. या लॅबच्या माध्यमातून व्याख्याने विविध कार्यशाळा, शिबिर, प्रात्यक्षिके असे अनेकाविध उपक्रम नियोजित असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
फोटो (१६०१२०२१-कोल-केआयटी कॉलेज) : कोल्हापुरात शनिवारी केआयटीच्या आयडिया लॅबसाठी ५५ लाखांचा निधी देत असल्याचे पत्र मयुरा स्टिल्सचे अध्यक्ष चंद्रशेखर डोली यांनी केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी शेजारी सुनील कुलकर्णी, दीपक चौगुले, सचिन मेनन, साजिद हुदली, व्ही. व्ही. कार्जिन्नी, सुभाष माने, शिवलिंग पिसे, आदी उपस्थित होते.