शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राभोवती गोल रिंगण, सूर्या भोवती खळं, कोल्हापुरातील खगोलप्रेमींनी घेतला आनंद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 16:41 IST

20 हजार फूटाच्या आसपास असणारे पांढरे ढग आपल्याला दिसत नाहीत, पण जेव्हा चंद्राचा प्रकाश त्या ढगांमधून जातो त्यामुळे आपल्याला चंद्राच्या भोवती एक प्रकाश वलय दिसू लागते. त्याला वैज्ञानिक भाषेत लुनार किंवा मून हॅलो इफेक्ट म्हणतात (lunar halo effect) . कोल्हापुरातील खगोलप्रेमींनी या घटनेचा मंगळवारी रात्री आनंद घेतला. 

ठळक मुद्देचंद्राभोवती गोल रिंगण, सूर्या भोवती खळं कोल्हापुरातील खगोलप्रेमींनी घेतला आनंद  

कोल्हापूर -20 हजार फूटाच्या आसपास असणारे पांढरे ढग आपल्याला दिसत नाहीत, पण जेव्हा चंद्राचा प्रकाश त्या ढगांमधून जातो त्यामुळे आपल्याला चंद्राच्या भोवती एक प्रकाश वलय दिसू लागते. त्याला वैज्ञानिक भाषेत लुनार किंवा मून हॅलो इफेक्ट म्हणतात (lunar halo effect) . कोल्हापुरातील खगोलप्रेमींनी या घटनेचा मंगळवारी रात्री आनंद घेतला. हा नजारा खूप कमी वेळा बघावयास मिळतो. चंद्राला खळे पडल्याचे निदर्शनास येत असून त्यात दहाचा आकडा दिसत असल्याच्या गमतीदार चर्चा होत आहेत.

सूर्याभोवती पडणारे खळं हे फिजिक्स मधील ऑप्टीकसचा भाग आहे.सूर्या भोवतालचा खळं किवां रिंगण हा प्रिसम मधून किरणे गेल्यानंतर जसे सप्त रंग दिसतात तसाच हा प्रकार आहे. या सूर्याभोवतीलच्या खळ्यास इंग्रजी मध्ये हॅलो (halo) असे म्हणतात. तसेच मराठीमध्ये इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ असे म्हणतात.

वादळ आल्यनंतर आकाशामध्ये जवळ जवळ 20 हजार फूट उंचीवरती सिरस नावाचे ढग तयार होतात. या ढगांमध्ये लाखोंच्या संख्येने लहान लहान बर्फाचे क्रिस्टल्स असतात. या क्रिस्टल्स मधून सूर्याची किरणे गेल्यानंतर त्या किरणांचे रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅकशन किंवा स्प्लिंटिंग होते. या मध्ये बर्फाचे असनारे तुकडे हे प्रिझम सारखे काम करतात.

पाण्याचा  रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा  १.३३ आहे.पाणी हे द्रव स्वरूपात असते तर बर्फ हा घन पदार्थ असतो. त्यामुळे हवेतून सूर्याची किरणे जेंव्हा घन पदार्थ मधून जातात तेव्हा माध्यम बदलते व किरणांचे वक्रीकरण होते. यातूनच सूर्याभोवतीलचे खळं पाहावयास मिळते. या गोलाची त्रिज्या 22 अंश डिग्री इतकी असते. यामध्ये या गोलाच्या आतील बाजूस लाल रंग दिसतो तर बाहेरच्या बाजूस निळा रंग दिसतो.

 

जेव्हा चंद्राचा प्रकाश त्या ढगांमधून जातो त्यामुळे आपल्याला चंद्राच्या भोवती एक प्रकाश वलय दिसू लागते. त्याला वैज्ञानिक भाषेत लुनार किंवा मून हॅलो इफेक्ट म्हणतात . हे खळे फक्त सूर्या भोवतीच दिसते असे नाही तर चंद्राभोवती देखील असे खळे दिसते. या मध्ये कुठीलीही अंधश्रद्धा बाळगू नये.प्रा . डॉ . मिलिंद मनोहर कारंजकर ,पदार्थ विज्ञान  व खगोल शास्त्र विभाग प्रमुख विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर .

 

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणkolhapurकोल्हापूर