रेशनसाठी कोल्हापुरात निकृष्ट गहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:04 AM2019-06-17T01:04:34+5:302019-06-17T01:04:39+5:30

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील रेशन गोदामांमध्ये निकृष्ट दर्जाचा गहू आला आहे. पुढील महिन्याकरिता वाटप ...

Rotten wheat in Kolhapur for ration | रेशनसाठी कोल्हापुरात निकृष्ट गहू

रेशनसाठी कोल्हापुरात निकृष्ट गहू

googlenewsNext

प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील रेशन गोदामांमध्ये निकृष्ट दर्जाचा गहू आला आहे. पुढील महिन्याकरिता वाटप होणारा हा गहू असून तो स्वीकारण्यास दुकानदारांनी विरोध केला आहे. याबाबत राज्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिवांना लेखी निवेदन दिले आहे तर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्याही निदर्शनास हा प्रकार आणला आहे. जर हा गहू रेशन दुकानांमधून वाटप झाला ग्राहकांकडून रोषाला सामोरे जावे लागण्याची चिंता दुकानदारांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे गहू बदलून द्यावा; अशी मागणी करण्यात आली आहे.
दर महिन्याला रेशनवर वाटप होणारा गहू हा एक महिना आधी रेशन गोदामांमध्ये येतो. ‘एफसीआय’च्या माध्यमातून गहू दिला जातो. दर महिन्याला जिल्'ासाठी १ लाख ३० हजार क्विंटल म्हणजे २ लाख ६० हजार पोती गहू १५७२ दुकानांमधून वितरित केला जातो. पुढील महिन्याचा गहू जिल्ह्यातील गोदामांमध्ये आला आहे. त्याची चलने दोन-चार दिवसांत निघून दुकानदारांना तो वितरित केला जाणार आहे; परंतु हा गहूच खराब असल्याने तो न स्वीकारण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला आहे. सिंधुदुर्गसह अन्य जिल्'ांत या महिन्यात गोदामांमध्ये आलेला गहू हा निकृष्ट दर्जाचा होता. त्यामुळे स्थानिक ग्राहकांच्या व लोकप्रतिनिधींच्या रोषाला दुकानदारांना जावे लागले. त्याचीच पुनरावृत्ती कोल्हापुरातही होईल, अशी भीती दुकानदारांमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी हे गहू स्वीकारण्यास कडाडून विरोध केला आहे तसेच या खराब गव्हाची तपासणी करावी व या खराब गव्हाऐवजी दुसरा गहू द्यावा, अशी मागणी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा पुरवठा विभागालाही याबाबत रेशन दुकानदार संघटनेच्या प्रतिनिधींनी कळविले आहे.

Web Title: Rotten wheat in Kolhapur for ration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.