शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी, क्रिडाईने ग्रामीण भागातही कोविडसाठी यंत्रणा उभारावी, पालकमंत्री पाटील यांची विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:08 IST

रोटरी आणि क्रिडाई या दोन्ही संस्थांनी एका हाकेवर नेहमीच मदतीसाठी पुढे येत अभिमानास्पद काम केले आहे. आता शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागात कोविड केंद्र उभारण्यासाठी पुढे यावे, असे विनंतीवजा आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

ठळक मुद्देरोटरी, क्रिडाईने ग्रामीण भागातही कोविडसाठी यंत्रणा उभारावी, पालकमंत्री पाटील यांची विनंतीमहासैनिक दरबार हॉल येथे कोविड केंद्राचे उद्घाटन

कोल्हापूर : रोटरी आणि क्रिडाई या दोन्ही संस्थांनी एका हाकेवर नेहमीच मदतीसाठी पुढे येत अभिमानास्पद काम केले आहे. आता शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागात कोविड केंद्र उभारण्यासाठी पुढे यावे, असे विनंतीवजा आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.रोटरी मूव्हमेंट, क्रिडाईने जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून महासैनिक दरबार हॉलमध्ये उभ्या केलेल्या कोविड-१९ केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते रविवारी झाले.

यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, क्रिडाईचे राज्याचे अध्यक्ष राजीव परीख, जिल्हाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील, सचिव ऋषिकेश केसकर, रोटरी मूव्हमेंटचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील-बुधिहाळकर उपस्थित होते.पालकमंत्री म्हणाले, क्रिडाई आणि रोटरी या दोन्ही संस्थांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्हेंटीलेटर आणि बेड देण्याचे आवाहन केले होते. एकूण ५३८ बेडचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांपैकी महासैनिक दरबार येथे १२५ बेडची सुविधा देण्यात आली आहे.

येत्या काळात या दोन्ही संस्थांनी नियोजन करून ग्रामीण भागात कायमस्वरूपी सुविधा उभी करावी असेही ते म्हणाले. यावेळी ह्यरोटरीह्णचे माजी प्रांतपाल प्रताप पुराणिक, प्रकाश जगदाळे, एस. एस. पाटील, उत्कर्षा पाटील, एम. वाय. पाटील, मेघना शेळके, योगिनी कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.रोटरीने अँटिजेन टेस्टिंग केंद्र उभे करावेपल्स पोलिओचे मोहीम रोटरीने हाती घेऊन पोलिओमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. आता रोटरीला अँटिजेन टेस्टिंग किट पुरविले जातील. त्यांनी अँटिजेन टेस्टिंग केंद्र उभे करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.रोटरीच्या १२ क्लबनी एकत्र येऊन ६२ लाख रुपयांच्या माध्यमातून ५३८ बेडची सुविधा निर्माण केली आहे. आयसोलेशन रुग्णालय आणि सावित्रीबाई फुले रुग्णालय येथेही स्वतंत्र रोटरी वॉर्ड करण्यात येणार आहेत, असे रोटरीचे संग्राम पाटील यांनी सांगितले. क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी १२५ बेडची सुविधा केली असून त्यासाठी ऑक्सिजनची सुविधाही देण्यात येईल असे सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर