शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रध्वजाची रोलरचक्री तुटली, ध्वजस्तंभावर झेंडा नसल्याने पर्यटक नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 17:22 IST

येथील पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस उद्यानात उभारण्यात आलेला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा व राज्यातील सर्वोच्च उंचीच्या राष्ट्रध्वजाची रोपवायर खराब होऊन रोलरचक्री तुटली आहे. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी झेंडा फडकला नसल्याने कोल्हापूरवासीयांसह पर्यटकांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे.

ठळक मुद्देदुरुस्तीसाठी पुण्यातील तज्ज्ञांकडून युद्धपाळीवर प्रयत्न सुरूराष्ट्रध्वज महिन्याभरापासून ध्वजस्तंभावर नसल्याने नाराजी

एकनाथ पाटीलकोल्हापूर : येथील पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस उद्यानात उभारण्यात आलेला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा व राज्यातील सर्वोच्च उंचीच्या राष्ट्रध्वजाची रोपवायर खराब होऊन रोलरचक्री तुटली आहे. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी झेंडा फडकला नसल्याने कोल्हापूरवासीयांसह पर्यटकांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे.

राष्ट्रध्वजाची रोपवायर खराब होऊन रोलरचक्री तुटल्याने झेंडा फडकला नसल्याने  पुण्यातील बजाज इलेक्ट्रिक कंपनीच्या तज्ज्ञांकडून दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. नेहमी थाटामाटात फडकणारा झेंडा गेल्या महिन्याभरापासून ध्वजस्तंभावर नसल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोल्हापूरला येणारे पर्यटक पोलिसांचे उद्यान पाहून भारावून जातील, अशी रचना करणारा आराखडा तयार करून उद्यान बनविण्यात आले आहे. उद्यानात देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे.

उद्यान व ध्वजस्तंभासाठी सुमारे एक कोटी खर्च आला आहे. २९ एप्रिल २०१७ रोजी त्याचे अनावरण व उद्यानाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रपती पुरस्कार विजेता बॉलिवूड अभिनेता ‘रुस्तम’ अक्षय कुमार यांच्या हस्ते राजेशाही थाटात झाले. गेली दोन वर्षे हा झेंडा दर शनिवारी आणि रविवारी थाटामाटात फडकत होता.

पावसाळ्यामध्ये चार महिने बंद ठेवला जातो; परंतु गेल्या महिन्याभरापासून ध्वजस्तंभावरील झेंडाच गायब झाला आहे. या ध्वजस्तंभाच्या मार्गावर मोठी वर्दळ असल्याने अनेकजण ध्वजस्तंभावर तिरंगा दिसत नसल्याने गोंधळून जात आहेत. या ध्वजस्तंभाची देखभाल दुरुस्ती केएसबीपी या कंपनीकडे आहे.झेंड्यामागचे गूढझेंडा गायब होण्याचे गूढ शोधले असता ध्वजस्तंभावरील रोलरचक्री तुटली आहे. त्यामुळे झेंडा वर-खाली घेता येत नाही. त्याचा रोप फिरत नसल्याने झेंडा फडकविता येत नसल्याचे सांगण्यात आले.

या ध्वजस्तंभाचा महिना ७० हजार रुपये दुरुस्ती खर्च आहे. पुण्यातील बजाज इलेक्ट्रिक कंपनीने ध्वजस्तंभाच्या रोलरचक्रीसह अन्य साहित्याची दहा ते बारा वर्षे गॅरंटी दिली आहे. तसा करारही झाला आहे. असे असताना दोन वर्षातच रोलरचक्री तुटल्याने ध्वजस्तंभाच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे.

केएसबीपीकडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असल्याने त्यांनी बजाज कंपनीच्या तज्ज्ञांना कोल्हापूरला बोलावून गेल्या पंधरा दिवसांपासून रोलरचक्री दुरुस्ती व बदलण्याचे काम सुरू आहे. या तज्ज्ञांना फारशे यश आलेले नाही. त्यामुळे प्रजास्ताकदिनी राष्ट्रध्वज फडकला नसल्याची पहिलीच वेळ आहे.

ध्वजस्तंभावरील रोलरचक्री तुटली आहे. त्यामुळे तिरंगा ध्वज फडकविता येत नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून तज्ज्ञांकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रजास्ताकदिनी  तिरंगा ध्वज तांत्रिक अडचणीमुळे फडकविला जाणार नाही, असा सूचना फलक उद्यानात लावला आहे.- सुजय पित्रे, अध्यक्ष, केएसबीपी

तांत्रिक अडचणीमुळे ध्वजस्तंभावरील झेंडा फडकविलेला नाही. त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या आहेत.डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक

 

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस