शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सहकारातील सूत गिरण्यांना मदत करण्याची भूमिका; चंद्रकांत पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2022 13:13 IST

मागच्या सरकारच्या काळात माझ्याकडे वस्त्रोद्योग खात्याचा कार्यभार होता, त्यावेळी काही सूचना करण्यात आल्या होत्या.

कोल्हापूर : राज्यातील साखर कारखानदारीपाठोपाठ सर्वांधिक रोजगार देणाऱ्या संस्था म्हणून सूत गिरण्यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या सूत गिरण्यांना मदत करण्याची आपली भूमिका राहिल, असे उच्च व तंत्र शिक्षण तसेच वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

मागच्या सरकारच्या काळात माझ्याकडे वस्त्रोद्योग खात्याचा कार्यभार होता, त्यावेळी काही सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु त्यावेळी निर्णय घेता आले नव्हते. परंतु आता मात्र हे खाते आल्यामुळे या सूचना अंमलात आणण्याचा आपला प्रयत्न असेल, असे सांगून मंत्री पाटील म्हणाले की, साखर कारखान्यापाठोपाठ सर्वाधिक रोजगार देणाऱ्या सूत गिरण्यांना मदत करण्याची भूमिका राहिल. कापूस उत्पादन होतो तेंव्हा त्याची किंमत तुलनेने कमी असते. नंतर ती हळूहळू वाढत जाते. म्हणून सरकारने कापूस खरेदी करुन व्याज लावून तो गिरण्यांना दिला तर स्वस्त मिळू शकतो.

वीज परवडत नसल्याने गिरण्यांना सोलरवर नेता येईल का, काही सबसिडी देता येईल का याचाही विचार करावा लागणार आहे. सूत गिरण्यांकडे असणाऱ्या अतिरीक्त जमिनी त्यांना विकण्यास परवानगी देऊन येणाऱ्या पैशातूनही या गिरण्यांना मोठी आर्थिक मदत होईल. राज्य सरकारचाही काही प्रमाणात भांडवल देण्याचा प्रयत्न राहिल, असे पाटील म्हणाले. 

नाराज होण्याचा प्रश्नच नाही - 

मागच्या सरकारच्या काळात अनेक मोठी खाती मिळाली होती, पण यावेळी तुलनेने कमी असलेले उच्च व तंत्र शिक्षण खाते मिळाले असल्याने आपण नाराज आहात का असे विचारता मी नाराज होण्याचा प्रश्नच नाही, उलट पंतप्रधान मोदी यांच्या नवीन शैक्षिणक धोरणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. कोणतेही मंत्रीपद कमी महत्वाचे वा जास्त महत्वाचे नसते. तुम्ही त्या पदावर किती चांगले काम करता हे जास्त महत्वाचे असते, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर