शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीसाठी रस्ते, दुकाने, मॉल फुल्ल : गर्दीमुळे नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 19:25 IST

CoronaVirus Kolhapur : पंधरा दिवस राज्यात संचारबंदी राहणार असल्याने शहराच्या विविध बाजारपेठा, भाजी मंडई तसेच दुकाने, मॉल मध्ये बुधवारी दिवसभर खरेदीसाठी जनसागर लोटला. लोकांनी अक्षरश: रांगा लावून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. तर मॉलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी चक्क तासभरांची प्रतिक्षा करावी लागली.

ठळक मुद्देखरेदीसाठी रस्ते, दुकाने, मॉल फुल्ल : गर्दीमुळे नियमांची पायमल्ली संचारबंदीचा परिणाम : रांगा लावून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी

कोल्हापूर : पंधरा दिवस राज्यात संचारबंदी राहणार असल्याने शहराच्या विविध बाजारपेठा, भाजी मंडई तसेच दुकाने, मॉल मध्ये बुधवारी दिवसभर खरेदीसाठी जनसागर लोटला. लोकांनी अक्षरश: रांगा लावून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. तर मॉलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी चक्क तासभरांची प्रतिक्षा करावी लागली.राज्यात आगामी पंधरा दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून सुरु झाली. गतवर्षी सलग दोन महिने झालेल्या संचारबंदीचा अनुभव असल्यामुळे यावेळी गैरसोय होऊ नये म्हणून पंधरा दिवस पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य, भाजीपाला, कडधान्ये खरेदी करुन ठेवण्याचा आटापिटा केला. मंगळवारी रात्री संचारबंदीची घोषणा झाली, त्यामुळे बुधवारचा दिवस उजाडताच शहरातील बाजारपेठेत सकाळी नऊ वाजल्यापासून गर्दी व्हायला लागली.धान्य बाजार, मिरची बाजार, शिवाजी मार्केटमधील दुकानगाळे, शहरातील सर्वच भाजी मंडई गर्दीने फुलून गेल्या. पुढील पंधरा दिवस घरात बसून करता येणाऱ्या कामांच्या अनुषंगानेही खरेदी झाली. काहींनी लग्नांच्या निमित्ताने खरेदी केली. प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकडे अधिक कल होता. विविध प्रकारच्या बिस्कीटापासून ते विविध प्रकारचे बेकरी खाद्य, अंडी खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली.महाद्वाररोड, ताराबाईरोड, कपिलतिर्थ मार्केट, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी पाच बंगला या परिसरात मोठी गर्दी उसळली होती. शहराच्या विविध भागातील रस्त्यावर विक्रेत्यांनी मांडलेल्या फळ बाजारातही खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. उपनगरातील भाजी मंडईतूनही नागरीकांची गर्दी उसळल्याचे चित्र पहायला मिळाले. काही मोठ्या दुकानातून तसेच मॉलमध्ये लोकांनी रांगा लावून खरेदी केली. रंकाळा व ताराबाई पार्क येथील मॉलमध्ये तर प्रवेश मिळविण्यासाठी एक एक तास प्रतिक्षा करावी लागत होती.संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत मोडणारे पेट्रोल पंप सुरु राहणार आहेत. परंतु आपणाला बाहेर पडायची अडचण झाली तर वाहनात पेट्रोल असलेले बरे म्हणून अनेकांना पेट्रोलची खरेदीही केली. काही पेट्रोल पंपावर रांगा लागल्या होत्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर