शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: चंदगड पुलावर पाणी, गोव्याची वाहतूक बंद; १४ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:47 IST

कोवाडला पुराचा धोका वाढला 

चंदगड : मुसळधार पावसाची संततधार बुधवारी सुरूच राहिल्याने घटप्रभा नदीवरील ७ तर ताम्रपर्णी नदीवरील ७ असे एकूण १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंदगड पुलावर पाणी आल्याने गोव्याकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असून, माडवळे, जंगमहट्टी, तेऊरवाडीत पडझड होऊन १ लाख ४३ हजारांचे नुकसान झाले आहे. कोवाडच्या जुन्या पुलावर पाणी आल्याने बाजारपेठेला पुराचा धोका वाढला आहे.रविवारपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, फाटकवाडी, जांबरे धरणातून विसर्ग सुरू असून, घटप्रभा नदीवरील पिळणी, तारेवाडी, कानडी-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, तर ताम्रपर्णी नदीवरील कोवाड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, माणगाव, शिप्पूर, चंदगड व कोकरे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंदगड पुलावर पाणी आल्याने गोव्याला जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.माडवळे येथे विठ्ठल निंगो गावडे यांची विहीर कोसळून ७० हजार, जंगमहट्टीत दौलत मरगू कांबळे यांची घराची भिंत कोसळून २८ हजार, तेऊरवाडीत सहदेव लक्ष्मण बुच्चे यांच्या घराची भिंत कोसळून ४५ हजारांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीची कामे ठप्प झाली आहेत.