शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रस्ता डांबरीकरण जानेवारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 12:09 IST

मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात नेहमीच प्रवासी, व्यावसायिकांची वर्दळ ठरलेलीच. त्यातच बसस्थानकासमोरील रिक्षाथांब्यामागे गेली ११ वर्षे रेंगाळलेल्या रस्त्याचे डांबरीकरण जानेवारी महिन्यात होणार असल्याची कबुली प्रशासनाने दिली. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य उजळले आहे. या रस्त्यासाठी सुमारे साडेआठ लाख रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रस्ता डांबरीकरण जानेवारीतमहानगरपालिका : प्रवासी, व्यावसायिकांचा त्रास होणार कमी

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात नेहमीच प्रवासी, व्यावसायिकांची वर्दळ ठरलेलीच. त्यातच बसस्थानकासमोरील रिक्षाथांब्यामागे गेली ११ वर्षे रेंगाळलेल्या रस्त्याचे डांबरीकरण जानेवारी महिन्यात होणार असल्याची कबुली प्रशासनाने दिली. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य उजळले आहे. या रस्त्यासाठी सुमारे साडेआठ लाख रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे.मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांची नेहमीचीच गर्दी असते. या परिसरात सुमारे २०० हून अधिक व्यावसायिक आहेत. या परिसरात मतदार नसल्याने नेहमीच येथील रस्त्यांची दुरवस्था ठरलेली आहे. गेल्या वर्षी या परिसरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण केले; पण बसस्थानकासमोर रिक्षाथांब्याच्या पिछाडीस असणाऱ्या रस्त्यावरून तुरळक प्रमाणात वाहतूक असली तरी दिवस-रात्र प्रवाशांची पायपीट मोठ्या प्रामाणावर असते. याच रस्त्यात मोठमोठे खड्डे, ड्रेनेजची झाकणे वर आली आहेत.

दाभोळकर चौकातून येणारी वाहतूक बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी प्रतिबंध असल्याने ती पुढे परीख पुलाकडे जाते. त्यामुळे दाभोळकर चौकाकडून येणारी दुचाकी, तीनचाकी अथवा मिनी वाहतूक ही रिक्षाथांब्याच्या पिछाडीच्या रस्त्याचा वापर करून बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडील रस्त्याकडे जाते; पण आता हाच मार्ग खड्डेमय बनला आहे; त्यामुळे लहान वाहनांना त्याचा त्रास होत आहे. त्याबद्दल प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे साडेआठ लाख रुपये खर्चाची निविदा काढली असल्याने या रस्त्याचे डांबरीकरण येत्या जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे.

या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सुमारे साडेआठ लाख रुपये खर्चाची निविदा काढली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्णत्वानंतर जानेवारी महिन्यात डांबरीकरणाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.- आशिष ढवळे,स्थायी सभापती, कोल्हापूर महापालिका.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूर