शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांची कामे मार्चअखेर पूर्ण : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:19 IST

महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सर्व रस्त्यांची कामे येत्या मार्चअखेर पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते चकाचक करण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देराज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांची कामे मार्चअखेर पूर्णपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; शैक्षणिक साधन संच वितरण

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सर्व रस्त्यांची कामे येत्या मार्चअखेर पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते चकाचक करण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.चेतना अपंगमती विकास संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साधन संच संवेदना फौंडेशनच्यावतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.चेतना अपंगमती विकास संस्थेच्या परिसरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री पाटील म्हणाले, गावात सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. आगामी तीन वर्षांत शासन योजना आणि लोकसहभागाद्वारे गावात विकासाचे नव-नवे प्रकल्प हाती घेऊन गावे स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनविली जातील.शासन योजना आणि लोकसहभागातून जिल्ह्यातील १९०० शाळा डिजिटल केल्या आहेत. शाळांना आवश्यक असणारी संरक्षक भिंत, क्रीडांगण उपलब्ध करून देण्याबरोबरच शाळा दुरूस्तीचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे.शिक्षण सभापती अमरिष घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.

संवेदना सोशल फौंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी शैक्षणिक साधन संच उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. चेतना अपंगमती विकास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. कन्या विद्यामंदिर भुयेवाडीचे मुख्याध्यापक विजयकुमार केंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील ३०० शाळांना शैक्षणिक साधन संच देण्यात आले. ‘पणन’चे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवीकांत आडसूळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर