शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधात रस्त्यावर या; मी तुमच्यासोबत : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:07 IST

कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील व्यापारी ‘जीएसटी’ कमी करून घेतात, तर मग महाराष्टÑातील व्यापारी हे का करू शकत नाहीत? तुम्ही दबलेले असतानाही तुम्ही गप्प का? अशी विचारणा करीत, सरकारविरोधात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊ

ठळक मुद्देव्यापारी, उद्योजकांशी संवाद; जानेवारीत व्यापारी, उद्योजकांच्या प्रश्नांवर मुंबईत बैठक घेणारटेंबलाई उड्डाणपुलाजवळील एका हॉटेलमध्ये आयोजित व्यापारी-उद्योजकांशी संवाद कार्यक्रम कोल्हापूरच्या विकासासाठी एखादा मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावेत

कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील व्यापारी ‘जीएसटी’ कमी करून घेतात, तर मग महाराष्टÑातील व्यापारी हे का करू शकत नाहीत? तुम्ही दबलेले असतानाही तुम्ही गप्प का? अशी विचारणा करीत, सरकारविरोधात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊन मोर्चा काढण्याची तुमची तयारी असेल तर मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे व्यापारी-उद्योजकांना दिली.

टेंबलाई उड्डाणपुलाजवळील एका हॉटेलमध्ये आयोजित व्यापारी-उद्योजकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्सतर्फे व्यापारी व उद्योजकांच्या ‘जीएसटी’सह विविध अडचणी व प्रश्नांंबाबतचे निवेदन उद्धव ठाकरे यांना दिले. यानंतर उद्योजक, व्यापाºयांनी आपल्या अडचणी व प्रश्न मांडले.

उद्धव ठाकरे म्हणाले, व्यापारी व उद्योजकांनी आपल्याकडे मांडलेल्या प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्र्याशी चर्चा करू; परंतु ‘जीएसटी’सह विविध प्रश्नांवर महाराष्टÑातील व्यापारी, उद्योजक गप्प का आहेत, असा प्रश्न पडतो. ते दबलेले असून आपल्या न्यायासाठी त्यांचे त्यांनाच उभे राहावे लागेल. त्यांनी रस्त्यावर येऊन मोर्चा काढण्याची तयारी ठेवल्यास मीही त्यांच्यासोबत राहीन. त्यांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जानेवारी महिन्यात मुंबईत व्यापारी व उद्योजकांच्या प्रश्नांवर बैठक घेतली जाईल.चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने म्हणाले, केंद्र व राज्य सरकारकडून व्यापारी व उद्योजकांसाठी जे काही करता येईल त्यासाठी प्रयत्न केले जावेत.

उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव म्हणाले, उद्योगासाठी विजेचे दर कमी करण्यासाठी सरकारकडे भूमिका मांडली जावी. कोल्हापूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर म्हणाले, शहरात दिल्लीसारखे ट्रॅफिक झाले असून यासाठी उड्डाणपूल होण्याची गरज आहे. तसेच वॉल मार्क कंपनीला शिवसेनेने बाजारात पाय ठेवू देऊ नये.

‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या विकासासाठी एखादा मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावेत. माजी अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, कोल्हापूरच्या विकासासाठी कोल्हापूर-बंगलोर कॉरिडॉरला चालना मिळावी.गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरजितसिंह पोवार म्हणाले, उद्योगवाढीसाठी जागा उपलब्ध नसून ती उपलब्ध करून द्यावी. इलेक्ट्रिकल असोसिएशनचे अध्यक्ष अजित कोठारी म्हणाले, शेतीउपयोगी इलेक्ट्रिक साहित्यावरील ‘जीएसटी’चे दर कमी व्हावेत.

‘क्रीडाई’चे अध्यक्ष महेश यादव म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी. केमिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील म्हणाले, ‘जीएसटी’मुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून औषधांचे दर वाढले आहेत.यावेळी संजय शेटे, गोरख माळी, जयेश ओसवाल, संदीप नष्टे, आदींसह व्यापारी उद्योजक उपस्थित होते.सरकारची वाटचाल हुकूमशाहीकडेकेंद्र व राज्य सरकार नोटाबंदीसारखे मनमानी निर्णय घेऊन सर्वसामान्यांना कष्टाच्या पैशांसाठी रांगेत उभे करीत असेल, तसेच स्वत:च्या पैशासाठी बोटाला शाई लावून घ्यावी लागत असेल, तर ही वाटचाल हुकूमशाहीआणि कम्युनिझमकडेच सुरू असल्याचे म्हणावे लागेल, असे ठाकरे यांनी सांगितले.सरकार म्हणजे ‘नवसाचे पोर’सरकार म्हणजे नवसाचे पोर असून ते उडाणटप्पू निघाल्यास काय बोलायचे ? असा टोला लगावत, ते पोर बिघडले म्हणून त्याला बोलण्याचे धाडस दाखवायचे का नाही? का नुसत्याच पेकाटात लाथा खायच्या, अशी कोटीही ठाकरे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण