शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार, काँग्रेसकडून लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 16:40 IST

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. ऋतुराज पाटील हे विधानसभेचे उमेदवार असतील आणि ते कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसकडून लढणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी गटाच्या मेळाव्यात गुरुवारी सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांची या मेळाव्यास उपस्थिती होती.

ठळक मुद्देऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार, काँग्रेसकडून लढणारआमदार सतेज पाटील यांची घोषणा : मंडलिक यांचे पण आता ‘आमचं ठरलंय..!

कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. ऋतुराज पाटील हे विधानसभेचे उमेदवार असतील आणि ते कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसकडून लढणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी गटाच्या मेळाव्यात गुरुवारी सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांची या मेळाव्यास उपस्थिती होती.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सतेज कार्यकर्ता संवाद मेळावा गुरुवारी येथील ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क येथे झाला. या मेळाव्यात कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघांसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मते ऐकून घेऊन पुढील दिशा ठरविण्यात आली.ऋतुराज याला आपल्या पदरात घ्या, असे आवाहन या मेळाव्यात सतेज पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी महाडिक यांच्यावर टीकास्त्र सोडले. मंडलिक यांनी नव्या पिढीला शिवसेनेत संधी द्या असे आवाहन करत ऋतुराज यांना विधानसभेची आॅफर दिली.

काँग्रेसची सध्या सत्वपरिक्षा सुरु आहे. मरेपर्र्यत या पक्षाची साथ मी सोडणार नाही असे स्पष्ट केले. एकाच घरात अनेक पक्षाची सत्ताकेंद्र असण्याला माझा विरोध आहे. या विरोधात माझा लढा सुरु आहे असे सांगत सतेज यांनी ही आॅफर नाकारली.मंडलिक यांचे पण आता ‘आमचं ठरलंय..!कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना लोकसभेला सतेज पाटील यांनी पाठिंबा देत उघड भूमिका घेतली होती. आता मंडलिक यांनीही विधानसभा निवडणूकीत आमचं ठरलंय अशी भूमिका घेत ऋतुराज पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला.खासदार प्रा. मंडलिक यांनी या मेळाव्यात बोलताना लोकसभा निवडणुकीवेळी ‘आमचं ठरलंय’ ही उघड भूमिका घेवून मला आमदार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी मदत केली; त्यामुळे एक मित्र म्हणून या मेळाव्यास मी उपस्थित आहे. ऋतुराज पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.लोकसभा निवडणूकीत कोल्हापूर दक्षिणचे भाजपचे आमदार अमल महाडिक हे मंडलिक हे युतीचे उमेदवार असतानाही राष्ट्रवादीचे उमेदवार व चुलतभाऊ धनंजय महाडिक यांच्या प्रचारात सक्रीय होते. त्यामुळे याता त्याचा वचपा काढण्यासाठी मंडलिक हे सतेज पाटील गटाला बळ देणार आहेत. शिवसेनेची या मतदार संघात कांही गावांत हुकमी मते आहेत.विधानसभा निवडणूकीत भाजप-शिवसेनेची युती असतानाही मंडलिक यांनी जाहीरपणे काँग्रेसच्या उमेदवारास बळ देण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील पुढील राजकीय फेरमांडणी कशी होणार याचीच ही चुणूक आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर