कोल्हापूर : रिक्षाचालक जितेंद्र शिंदे हे कोरोनाबाधित रुग्णांना मोफत रिक्षा सेवा व गरोदर महिलांना, दिव्यांगांना घरपोच औषधे, भाजीपालासुद्धा मोफत पाेहोचवत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांना मदतीचा हात देताना पीपीई किट उपलब्ध करू दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रात्री-अपरात्री कोणालाही रुग्णालयात जाण्याची वेळ आली तर मोफत घेऊन जाणे व परत सुखरूप घरी आणून सोडणे, आदी कामे स्वत: पदरमोड करून शिंदे करत आहेत. गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतही त्यांनी कोरोना बाधितांना रुग्णालयापर्यंत मोफत सोडण्याची सुविधा दिली होती. यंदाही ते हेच काम विनामूल्य करत आहेत. या त्यांच्या कामाची दखल घेत आमदार ऋतुराज पाटील यांनी शनिवारी रात्री त्यांना पीपीई किट देऊन मदतीचा हात दिला. याशिवाय आमदार पाटील यांनी शिंदे यांना भरीव मदत करण्याचे नियोजन केले आहे. यावेळी स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, दुग्रेश लीग्रस, विनायक सूर्यवंशी, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विनायक पाटील, राजदीप भोसले, योगेश हातलगे, शैलैश जाधव, सुभाष लगारे, मदन बागल, अनिकेत कांबळे, आदी उपस्थित होते.
फोटो : ०९०५२०२१-कोल-जितेंद्र शिंदे
आेळी : कोरोनाबाधितांसह गरजूंना मोफत रिक्षा सेवा देणाऱ्या जितेंद्र शिंदे यांना शनिवारी आमदार ऋतुराज पाटील यांनी पीपीई किट देऊन मदतीचा हात दिला.