शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर ‘अग्निशमन’ची जोखीम-कोल्हापूर महापालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:35 IST

स्वत:चा जीव धोक्यात घालून अहोरात्र, प्रामाणिकपणे सेवा बजावणाºया महापालिकेच्या अग्निशमन दलातील कर्मचारी अपुऱ्या संख्याबळावर जोखीम पत्करत आहेत.

ठळक मुद्दे कोणत्याही घटनेत जीवितहानी, नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत अग्निशमन दल अहोरात्र सेवा देते.

तानाजी पोवार ।कोल्हापूर : स्वत:चा जीव धोक्यात घालून अहोरात्र, प्रामाणिकपणे सेवा बजावणाºया महापालिकेच्या अग्निशमन दलातील कर्मचारी अपुऱ्या संख्याबळावर जोखीम पत्करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या एकूण १८२ पदांपैकी सुमारे ११२ पदे रिक्त आहेत. त्यातच सुमारे ६० कर्मचारी ठोक मानधनावर घेऊन मलमपट्टी करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. फोन खणखणला की कोणताही विचार न करता आवश्यक साधनसामग्रीसह घटनास्थळी वेळेत पोहोचून समोरील धोक्याचा सामना करणे, हेच या दलाचे ध्येय.

कोल्हापूर महानगरपालिकेची संपूर्ण शहरामध्ये सहा ठिकाणी अग्निशमन केंद्रे आहेत. त्यामध्ये सहा फायर फायटरसह चार वेगवेगळ्या ठिकाणी चार फायर बुलेटची सुविधा उपलब्ध आहे. महापालिकेतील हा विभाग ‘जोखीम अंगावर घेऊन सेवा बजावणारा’ म्हणून ओळखला जातो; पण या विभागातील ठोक मानधनावरील कर्मचाºयांची सेवा मात्र जिवावर उदार होऊन आहे.

घराला आग लागलेली असो, पाण्यात बुडणारा असो, अगर विजेच्या तारेवर अडकलेला पक्षी असो, कोणत्याही घटनेत जीवितहानी, नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत अग्निशमन दल अहोरात्र सेवा देते.विभागात कर्मचाºयांची एकूण १८२ मंजूर पदे आहेत; पण त्यापैकी फक्त ७० कर्मचारीच कायम आहेत, तर ११२ कर्मचाºयांच्या जागा गेली १0 वर्षे रिक्त आहेत. फायरमनच्या ६१ रिक्त जागेवर ४१ कर्मचारी तोकड्या ठोक मानधनावर नऊ वर्षे कार्यरत आहेत. निवृत्त जागा भरल्याच जात नाहीत.ठोक मानधन कर्मचारी असुरक्षितठोक मानधनावर २०१२ मध्ये भरती केलेले सुमारे ६२ कर्मचारीही कायम सेवेतील कर्मचाºयांप्रमाणेच जिवावर उदार होऊन सेवा बजावतात. सुविधा देताना मात्र त्यांच्यात दुजाभाव आहे. त्यांना स्वखर्चाने गमबूट, गणवेश, रेनकोट, आदी साहित्य घ्यावे लागते. तसेच सुरक्षा विमाही नाही.अ. पदाचे नाव मंजूर कार्यरत रिक्तनं. पदे पदे पदे१ मुख्य अग्निशमन ०१ ०० ०१अधिकारी२ उपमुख्य अग्निशमन ०१ ०१ ००अधिकारी३ स्थानक अधिकारी ०३ ०२ ०१४ लिपिक ०१ ०१ ००५ वाहनचालक ३२ १३ १९६ टेक्निकल इंस्ट्रक्टर ०१ ०० ०१७ तांडेल २१ ०२ १९८ फायरमन १०८ ४७ ६२९ अटेंडंट १४ ०४ १०फायर स्टेशन : ताराराणी चौक, लक्ष्मीपुरी (कांदा - बटाटा मार्केट), कसबा बावडा, टिंबर मार्केट, फुलेवाडी, शास्त्रीनगर-प्रतिभानगर.१ रेस्क्यू व्हॅन, ४ फायर बुलेटचार शववाहिकांचाही भार अग्निशमन दलावरच.नवीन मंजूर फायर स्टेशन : साकोली कॉर्नर (शिवाजी पेठ) व नवीन वाशी नाका; पण कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे मंजूर फायर स्टेशन विस्मरणात गेली आहेत. 

अपुऱ्या कर्मचाऱ्यांबाबत आयुक्तांकडे अहवाल पाठवला आहे. चालक कमी असल्याने त्या ठिकाणी खासगी कंपनीकडून भरती सुरूआहे, तर इतर भरतीबाबतची प्रक्रिया लवकरच होईल.

- रणजित चिले, प्र. मुख्य अधिकारी, अग्निशमन दल, को.म.न.पा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjobनोकरी