शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांना मताचा अधिकार निर्णायक : अधिकार वापरू शकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:09 IST

राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने गावपातळीवरील सरपंचपद थेठ जनतेतून निवडण्याचा कायदा लागू केल्यावर ग्रामीण भागातील काही ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली होती.

ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संभ्रमावस्था दूर

राधानगरी : राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने गावपातळीवरील सरपंचपद थेठ जनतेतून निवडण्याचा कायदा लागू केल्यावर ग्रामीण भागातील काही ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली होती. अशा प्रकारे निवडून आलेल्या सरपंचांना उपसरपंचपदाच्या निवडणुकीत मताच्या अधिकाराची असलेली संभ्रमावस्था मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने दूर झाली आहे. त्यांना असा अधिकार असल्याच्या या निर्णयाने आणखी काही ठिकाणी समीकरणे बदलणार आहेत. तालुक्यात चांदेकरवाडी येथे या निर्णयाचा परिणाम जाणवणार आहे.

ही पद्धत पहिल्यांदाच सुरू झाल्याने त्याची अंमलबजावणी करताना काही अडचणी आल्या होत्या. नवनिर्वाचित समिती सत्तेवर आल्यावर फक्त उपसरपंच पदासाठीच निवड होत आहे. ही निवड सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली होते. यासाठी त्यांना मताचा अधिकारनाही. मात्र, या निवडीत समान मते पडली तरच केवळ निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंचानाहोता. मात्र, अशी स्थिती अपवादानेच होते.

याबाबत झालेल्या न्यायालयीन वादात नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यात सरपंचानाही अन्य सदस्यांप्रमाणे उपसरपंच निवडणुकीत मताचा अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शिवाय पूर्वीप्रमाणे समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकारही अबाधित ठेवला आहे. त्यामुळे याबाबत असलेला संभ्रम दूर झाला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड अजून झालेली नाही. त्यामुळे या निवडणुका आता या नव्या आदेशानुसार होतील.

सरपंचांना दिलेल्या मताच्या अधिकाराने काही गावातील सत्ता परिवर्तन होणार आहे. राधानगरी तालुक्यात चांदेकरवाडी येथे झालेले सत्ता परिवर्तन आता बदलणार आहे. येथे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सरपंच पद व चार जागा मिळाल्या आहेत. तर विरोधी सर्व पक्षीय आघाडीला पाच जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे जुन्या निर्णयानुसार उपसरपंच पद विरोधी आघाडीला मिळणार होते. मात्र, आता सरपंचाच्या मताने समान मते होतील. त्यामुळे सरपंच आपला निर्णायक मताचा अधिकार वापरू शकतील. अर्थात ते त्यांच्या बाजूने असेल त्यामुळे चार सदस्यांपैकी एकजण उपसरपंच होईल.सदस्यांचे महत्त्व कमीआॅक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात असलेल्या सदस्य संख्येव्यतिरिक्त हे पद आहे. गावातील सर्व लोकांना यासाठी मतदान करण्याचा अधिकार आहे.गावाच्या विकास प्रक्रियेत यामुळे काही फायदे असले तरी काही अडचणीही तयार झाल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे निवड झाल्यामुळे काही प्रमाणात निवडून आलेल्या सदस्यांचे महत्त्व काही प्रमाणात कमी झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsarpanchसरपंच