गडहिंग्लज पालिकेकडून बचत गटांना फिरता निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:00 AM2021-01-13T05:00:16+5:302021-01-13T05:00:16+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपरिषदेकडील राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत शहरातील दारिद्रयरेषेखालील नोंदणीकृत महिला बचत गटांना फिरता निधी मंजूर झाल्याचे पत्र ...

Revolving fund for self help groups from Gadhinglaj Municipality | गडहिंग्लज पालिकेकडून बचत गटांना फिरता निधी

गडहिंग्लज पालिकेकडून बचत गटांना फिरता निधी

Next

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपरिषदेकडील राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत शहरातील दारिद्रयरेषेखालील नोंदणीकृत महिला बचत गटांना फिरता निधी मंजूर झाल्याचे पत्र वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी होत्या.

अभियानांतर्गत शहरातील ७ महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे ७० हजार रूपये फिरता निधी मंजूर झाल्याचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी ''माझी वसुंधरा मोहीम व स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१'' अंतर्गत बचतगटातील महिलांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. अभियानाचे सहायक प्रकल्प अधिकारी जयवंत वरपे यांनी शहरातील बचतगटांची माहिती दिली. शहरात ११६ बचतगट असून ९३ बचत गटांना पालिकेकडून फिरता निधी दिला आहे. ८९ बचत गटांनी व्यवसासायाठी बँकेकडून १ कोटी ३३ लाख ६५ हजार रुपये इतके कर्ज घेतले असून परतफेडीचे प्रमाणही चांगले असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास वाचनालय समिती सभापती सुनीता पाटील, महिला व बालकल्याण सभापती वीणा कापसे, महिला आर्थिक विकास मंडळाच्या सीमा पाटील, शहर प्रतिनिधी विद्या कांबळे, समुदाय संघटक संदीपकुमार कुपटे आदी उपस्थित होते.

------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे नगराध्यक्षा स्वाती कोरी, वीणा कापसे, सुनीता पाटील यांनी महिला बचत गटांना फिरता निधी वितरीत केला.

क्रमांक : १००१२०२१-गड-०१

Web Title: Revolving fund for self help groups from Gadhinglaj Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.