शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

एसटी बँक विकासाचा टॉप गिअर टाकण्याची आशा; बेकायदेशीर नोकर भरती, तज्ज्ञ संचालकांच्या नेमणुकीला चाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 13:33 IST

गुणरत्न सदावर्ते आणि त्याची पत्नी जयश्री यांचे संचालकपद सहकार खात्याने रद्द केले

सचिन यादव कोल्हापूर : एसटी बँकेवरील तज्ज्ञ संचालक म्हणून गुणरत्न सदावर्ते आणि त्याची पत्नी जयश्री यांचे संचालकपद सहकार खात्याने रद्द केले आहे. त्याचा परिणाम म्हणून सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द केल्याने पुन्हा एकदा एसटी बँक विकासाचा टॉप गिअर टाकण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ठेवी काढून घेणे, बेकायदेशीर नोकर भरती, तज्ज्ञ संचालकांच्या नेमणुका थांबणार आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना बंद केलेले कर्जवाटप पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.द स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकेवर (एसटी) सदावर्ते पॅनेलची सत्ता आहे. त्यामध्ये सदावर्तेच्या १० आणि शिंदे गटाच्या ९ संचालक आहेत. सहकार खात्याने दिलेल्या निर्णयामुळे सदावर्ते दांपत्याला तज्ज्ञ संचालकपदावरून मुक्त केले आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या १० संचालकांवर एसटी सभासदांच्या विविध प्रलंबित प्रश्न सोडवणुकीचा दबाव वाढणार आहे. शिंदे गट विरोधात सदावर्ते गट असे एसटी बँकेच्या राजकारणात चित्र असले तरी सर्वसामान्य एसटी बँकेच्या सभासदाला कर्ज आणि सुरक्षित ठेवींची चिंता आहे.

४६६ कोटींच्या ठेवी काढल्यासदावर्ते पॅनेलचे संचालक मंडळ आल्यापासून बँकेतून ४६६ कोटींच्या ठेवी काढल्या. त्यामुळे बँकेचा आर्थिक डोलारा कोलमडला. बँकेचा सीडी रेशोही ९० टक्क्यांपेक्षा अधिक गेला. सीडी रेशो वाढल्याने सध्या बँकेतून कर्जवाटप बंद आहे. त्यामध्ये आणखी वाढ झाल्यास बचत खात्यातील पैसे काढण्यावरही मर्यादा येतील. राजीनामा दिलेल्या आणि एसटीमधून निवृत्त झालेल्या सुमारे साडेतीन हजार सभासदांच्या पैशाचा प्रश्नही गंभीर आहे.

वार्षिक सभेचे पडसादसदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळ येथे बँकेची वार्षिक सभा घेतली. सभेपूर्वी सभासदांना अहवालाचे वाटप केले नव्हते. वार्षिक सभा घेण्यापूर्वी सभासदांना १४ दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देणे आवश्यक होते. अशा कुठल्याही सूचना संचालक मंडळाने दिल्या नसल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेने केला होता. त्यातूनच ‘आरबीआय’ आणि सहकार खात्याकडे तक्रारी झाल्या.

आरोप

  • बँकेचे व्यवस्थापन सक्षम नाही
  • चुकीचे अधिकारी नेमले
  • ‘आरबीआय’च्या मार्गदर्शक सूचनांना हरताळ
  • बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे निर्वाचित संचालकांतून असण्याचा ठराव
  • एसटी बाहेरच्या लोकांना बँकेचे सदस्यत्वाचा ठराव
  • ठेवीच्या व्याजापेक्षा कमी दराने कर्ज

अनेक आरोपबँकेचे व्यवस्थापकीय संचालक सदावर्ते यांचे नातेवाईक असल्याचा आरोप झाला. सदावर्ते यांच्या २३ वर्षीय मेहुण्यालाही पद दिल्याचा आरोप झाला. गरज नसताना नोकरभरतीचा घाट रचला. त्यामुळे एसटी बँक अडचणीत आल्याचा आरोप सभासदांनी केला.

एसटी बँक

  • ६२ हजार सभासद
  • ५० शाखा
  • १८४५ कोटींच्या ठेवी
  • सीडी रेशो ९० टक्क्यांहून अधिक

सहकार खात्याकडे एकूण १३ विषयांची तक्रार केली होती. त्यामध्ये बेकायदेशीर कर्मचारी भरतीला स्थगितीसह वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले ठरावही स्थगित केले. त्यामुळे किमान एसटी बँक विकासाच्या दिशेने नव्याने वाटचाल करेल. - संदीप शिंदे, केंद्रीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्ते