वाघजाई डोंगराची वाट लावण्यात महसूलचा ‘हात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:31 AM2021-09-07T04:31:11+5:302021-09-07T04:31:11+5:30

कोल्हापूर शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर वाघजाईचा १८०० एकरचा डोंगर आहे. या डोंगरातील काही क्षेत्र तुळशी प्रकल्पग्रस्तांना वाटप केले. ...

Revenue 'hand' in waiting for Waghjai mountain | वाघजाई डोंगराची वाट लावण्यात महसूलचा ‘हात’

वाघजाई डोंगराची वाट लावण्यात महसूलचा ‘हात’

Next

कोल्हापूर शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर वाघजाईचा १८०० एकरचा डोंगर आहे. या डोंगरातील काही क्षेत्र तुळशी प्रकल्पग्रस्तांना वाटप केले. वाटप जमीन नाकारून अनेक प्रकल्पग्रस्तांनी दुसरीकडे जमीन घेतली. तरीही १९७२ च्या आदेशानुसार वाघजाई डोंगरातील जमिनीवर प्रकल्पग्रस्तांची नावे राहिली आहेत. याचा गैरफायदा घेत दलालांनी कवडीमोल किमतीमध्ये धनदांडग्यांना जमिनी विकल्या आहेत. यातून डोंगरालगत एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्याने २०० एकर जमीन घेऊन सपाटीकरण केले आहे. चर खोदण्यात आली आहे. अशा प्रकारे सपाटीकरणामुळे मोठा पाऊस पडल्यास डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मरळी, भामटे, चिंचवडे, म्हाळुंगे, कुशिरे, पुनाळ, पडळ, सातार्डे आदी गावांना धोका निर्माण झाला आहे. याकडे महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याच्याही तक्रारी आहेत. कारवाई केल्याचे कागदोपत्री दाखवण्यासाठी पन्हाळा तहसीलने बेकायदेशीर उत्खननप्रकरणी किरकोळ कारवाई कारवाई केली आहे. सुमारे ३०० एकरांपर्यंत उत्खनन झाल्यासंबंधी प्रशासन कानावर हात ठेवत आहे.

चौकट

मोठे रॅकेट

वाघजाई डोंगरातील जमीन नाममात्र रकमेत घेण्याचा सपाटाच लावला आहे. मुळात डोंगराच्या जमिनीचा ताबा स्थानिक ग्रामस्थांकडे आहे, पण महसूल प्रशासनाला हाताशी धरून परस्पर जमीन खरेदी करून ताबा घेण्यासाठी धनदांडगे दादागिरी करीत आहेत, असाही आरोप होत आहे.

Web Title: Revenue 'hand' in waiting for Waghjai mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.