शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बदला म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरांत चोरी-कळंबा कारागृहातून बाहेर पडलेल्या कैद्याची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 19:27 IST

कळंबा मध्यवर्ती कारागृहासमोरील निवासस्थानांत चार घरफोड्या करणाºया सराईत चोरट्यास जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. संशयित राजेंद्र गणपती केदार (वय ३८, रा. डोणाज, ता. मंगळवेढा, सोलापूर) असे त्याचे नाव आहे. कारागृहात शिक्षा भोगत

ठळक मुद्देसाडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहासमोरील निवासस्थानांत चार घरफोड्या करणाºया सराईत चोरट्यास जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. संशयित राजेंद्र गणपती केदार (वय ३८, रा. डोणाज, ता. मंगळवेढा, सोलापूर) असे त्याचे नाव आहे. कारागृहात शिक्षा भोगत असताना अधिकारी व महिला कर्मचाºयांनी आपणाला खूप त्रास दिला होता. कारागृहाबाहेर कामे करीत असताना त्यांची घरे हेरून ठेवली होती. जामिनावर बाहेर पडल्यानंतर सोलापूरहून चार वेळा कोल्हापुरात येऊन बदला घ्यायचा म्हणून त्यांची घरे फोडून चोरी केली, अशी कबुली संशयित केदार याने दिली. त्याच्या ताब्यातून चोरीचे सोने, टीव्ही असा साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

अधिक माहिती अशी, मंगळवेढा, चडचण आणि सांगली या ठिकाणी चोरी, तरुणींचे अपहरण करून अत्याचार, दहशत अशा प्रकारचे गुन्हे दाखल असणारा राजेंद्र केदार याला एका गुन्ह्यात २००५ साली जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो कळंबा कारागृहात होता. कारागृहात असताना त्याच्याकडून झाडांना पाणी घालणे, वस्तूंची ने-आण, शेतात कामे करणे अशी कामे करून घेतली जात होती. त्याला कारागृह उपनिरीक्षक महादेव दशरथ होरे, कॉन्स्टेबल रूपाली लालचंद नलवडे, संगीता चव्हाण, वैशाली सदाशिव पाटील यांनी त्रास दिला होता. याचा त्याला राग होता. काम करण्यासाठी बाहेर जाताना त्याने कारागृहाच्या परिसरातील या अधिकाºयांसह कर्मचाºयांची निवासस्थाने हेरून ठेवली होती. डिसेंबर २०१८ मध्ये तो कारागृहातून बाहेर पडला. त्यानंतर तो गावी गेला. आपणाला त्रास दिल्याचा बदला घेण्यासाठी तो सोलापूरहून कोल्हापुरात आला. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालवधीत त्याने चौघा

कर्मचाºयांची घरे फोडून मुद्देमाल लंपास केला.कारागृह निवासस्थानी एक नव्हे चार चोºया झाल्याने पोलीस चक्रावून गेले होते. चोरट्याचा शोध घेत असताना कारागृह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये संशयित केदार संशयितरीत्या फिरताना दिसून आला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी हनी ट्रॅप लावला होता. पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीचा शोध घेऊन, तिला फोन करून बोलावून घेण्यास सांगितले. तिने ‘माझ्याकडे पैसे नाहीत. मला कामानिमित्त पैशांची गरज आहे. तू सांगली बसस्थानकावर ये,’ असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर तो तिला भेटण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला पकडले. त्याचे ताब्यातून एलईडी टीव्ही, दुचाकी, १५ तोळे सोन्याचे दागिने, आदी मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, उपनिरीक्षक अविनाश माने, डी. बी. पथकाचे सचिन देसाई, अमित सुळगावकर, परशुराम गुजरे, प्रीतम मिठारी, गजानन परीट, एकनाथ चौगुले, हणमंत कुंभार, बजरंग लाड, प्रदीप पाटील, संदीप बेंद्रे, नितीन कुराडे यांनी केली.महिला कॉन्स्टेबलला खुनाची धमकीसंशयित राजेंद्र केदार याने कारागृहाच्या महिला कॉन्स्टेबल वैशाली पाटील यांच्या घरात चोरी केली. त्यावेळी पाटील ड्यूटीवर होत्या. त्यांचा फोन नंबर मिळवून केदारने फोन करून ‘तुमच्या घरात मी चोरी केली. जर तुम्ही सापडला असता तर तुमचा खून करणार होेतो,’ अशी धमकी त्याने दिली होती. त्याने फोन केल्यामुळेच पोलिसांना त्याच्याविरोधात थेट पुरावा मिळाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर