कोल्हापूर : जिल्ह्णातील दहा मतदारसंघांतील मतमोजणी रविवारी (दि. १९) सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत मतमोजणीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितली. प्रत्येक मतदारसंघांची मतमोजणी ही तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे तर कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण व करवीर या तीन मतदारसंघांची मतमोजणी ही कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत होणार आहे. प्रत्येक मतदारसंघांत प्रत्येकी १४ टेबलांवर मतमोजणी होईल. मतमोजणीच्या प्रारंभी पोस्टल मतांची मोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र दोन टेबले ठेवली जाणार आहेत. ज्या इमारतीत मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. त्या इमारतीभोवती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बुधवारी ग्रामीण भागात सकाळी आठ वाजेपर्यंत धुक्क्यामुळे दहा पावलांवरील काही दिसत नव्हते. पहिल्या तासांत मतदानासाठी फारसे कुणी फिरकले नाही. मतदान कर्मचारी वाफाळलेला चहा घेत मतदारांची प्रतीक्षा करत बसले होते. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात प्रतिभानगर, राजेंद्रनगर आदी भागांत मतदान बूथवर लोकांची झुंबड उडाली होती. कारण मतदारांना त्यांचे नावच यादीत सापडत नव्हते. एका केंद्रावर किमान तीन-तीन याद्या होत्या. त्यात नाव लवकर सापडत नव्हते. एकाच कुटुंबातील वेगवेगळ््या ठिकाणी नावे लागली होती. त्यामुळे मतदार यादीतील नाव शोधून काढणे हेच काही ठिकाणी त्रासाचे ठरले परंतु तरीही मतदारांनी नावे शोधून काढून मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीची ठिकाणे अशी मतदारसंघ मतमोजणी केंद्र१) चंदगडपॅव्हेलियन हॉल, नगरपरिषद गडहिंग्लज २) राधानगरीतालुका क्रीडा संकुल, मौनी विद्यापीठ गारगोटी३) कागलजवाहर नवोदय विद्यालय, कागल (ता. कागल)४) कोल्हापूर (दक्षिण)इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट बिल्डिंग, गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक, कोल्हापूर तळमजला, उत्तर बाजू ५) कोल्हापूर (करवीर)पहिला मजला, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट बिल्डींग, गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक, कोल्हापूर तळमजला, उत्तर बाजू ६) कोल्हापूर (उत्तर)इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट बिल्डिंग,गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक, कोल्हापूर तळमजला,दक्षिण बाजू७) शाहूवाडीतहसीलदार कार्यालय, शाहूवाडी ८) हातकणंगले शासकीय धान्य गोदाम, हातकणंगले९) इचलकरंजी राजीव गांधी गोदाम, हातकणंगले१०) शिरोळपंचायत समिती सभागृह, पंचायत समिती, शिरोळ
रविवारी दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार
By admin | Updated: October 16, 2014 01:07 IST