शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पन्हाळ्यावरील विश्रामगृह, मुख्यालयातील उपहारगृहही बंद, उत्पन्नावर पाणी; कोल्हापूर जिल्हा परिषदेची अनास्था

By समीर देशपांडे | Updated: January 20, 2025 16:19 IST

जाहिराती मुंबईच्या वृत्तपत्रांत..

समीर देशपांडे कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीच्या गोष्टी केल्या जात असताना अनास्थेमुळे उत्पन्नावरच पाणी सोडण्याची वेळ आली आहे. पन्हाळा किल्ल्यावरील ‘गोपाळतीर्थ’ विश्रामगृह न्यायालयात दावा असल्याने बंद आहे. तर मुख्यालयातील उपहारगृहही साडे तीन वर्षे बंद आहेे. एकूणच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या मालमत्तांविषयी अनास्था असल्याचेच दिसून येत आहे.पन्हाळ्यावरील ‘गोपाळतीर्थ’ हे १ जून १९१८ पासून ३१ मे २०२३ पर्यंतच्या पाच वर्षांच्या कराराने भाड्याने आरती धुमाळ यांनी चालवायला घेतले होते. पहिल्या वर्षासाठी ३ लाख ३३ हजार रुपये भाडे ठरले आणि दरवर्षी त्यात १० टक्के वाढ होणार होती. त्यांनी तीन वर्षांचे भाडे भरले. परंतु ८ मे २००० रोजी अर्ज दिला आणि महापूर आणि कोरोनामुळे व्यवसायात मंदी आल्याने भाडे माफ करावे, अशी मागणी केली.मुदत संपेपर्यंत विश्रामगृह वापरले परंतु शेवटच्या दोन वर्षांचे ७ लाख २७ हजार ४६८ रुपये भाडे थकवले. ३ मे २०२३ रोजी मुदत संपल्याने विश्रामगृह वापरू नये, असे पत्र जिल्हा परिषदेने त्यांना दिले. यातून वाद होऊन धुमाळ यांनी पन्हाळा न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्याचा ९ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे धुमाळ यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली आहे.जिल्हा परिषदेच्या पाठीमागील बाजूस अभिलेख कक्षावरती आठ वर्षांपूर्वी उपहारगृह बांधण्यात आले. काही वर्षे ते चालले. परंतु नंतर जादा भाड्यामुळे ते कोणीही चालवण्यास घेतले नसून आजही ते बंद अवस्थेत आहे. साडे अकरा हजार रुपये भाड्याने चालवायला देण्याबाबत निर्णयही झाला. परंतु एकाही अधिकाऱ्याने याकडे लक्ष न दिल्याने सध्या हे उपहारगृह पडून आहे.

जाहिराती मुंबईच्या वृत्तपत्रांत..हे उपहारगृह चालविण्यासाठीच्या तीन जाहिराती मुंबईच्या दैनिकांमध्ये देण्यात आल्या होत्या. जर कोल्हापुरातील उपहारगृह चालवण्यासाठी द्यायचे असेल तर जाहिराती मुंबईच्या दैनिकांमध्ये का, असा प्रश्न आता उपस्थित होत असून कोणाला तरी लाभ देण्यासाठीच अधिकाऱ्यांनी हा कारभार केल्याचे पुढे आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद