शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संजीव संकपाळ, अतुल डाके यांच्या चित्र-शिल्पांच्या प्रदर्शनाला बुसानमध्ये प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 15:56 IST

दक्षिण कोरिया येथील बुसान इंटरनॅशनल आर्ट फेअरमध्ये भरविण्यात आलेल्या चित्र-शिल्प महोत्सवातील प्रदर्शनात सहभागी झालेल्या कोल्हापुरातील प्रसिद्ध चित्रकार संजीव संकपाळ आणि शिल्पकार अतुल डाके यांच्या कलाकृतींना दर्शकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देसंजीव संकपाळ, अतुल डाके यांच्या चित्र-शिल्पांच्या प्रदर्शनाला बुसानमध्ये प्रतिसादकोरियातील बुसान आर्ट फेअरमध्ये कोल्हापूरचे दोन कलावंत सहभागी

कोल्हापूर : दक्षिण कोरिया येथील बुसान इंटरनॅशनल आर्ट फेअरमध्ये भरविण्यात आलेल्या चित्र-शिल्प महोत्सवातील प्रदर्शनात सहभागी झालेल्या कोल्हापुरातील प्रसिद्ध चित्रकार संजीव संकपाळ आणि शिल्पकार अतुल डाके यांच्या कलाकृतींना दर्शकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या आंतरराष्ट्रीय आर्ट फेअरमध्ये जगभरातील कलावंतांचा सहभाग आहे. या महोत्सवातील प्रदर्शनात कोल्हापुरातील चित्रकार आणि शिल्पकार संजीव संकपाळ तसेच अतुल डाके यांना निमंत्रण देण्यात आले आहे. हे दोन्ही कलावंत सध्या बुसानमध्ये असून, त्यांच्या कलाकृतींना प्रतिसाद मिळत आहे. संजीव संकपाळ यांची चित्रे आणि अतुल डाके यांच्या शिल्पाकृतींचा या प्रदर्शनात समावेश आहे.या महोत्सवातील प्रदर्शनात कोल्हापुरातील या दोन कलावंतांच्या चित्रांचा आणि शिल्पांचा समावेश आहे. या महोत्सवात हे दोन्ही कलावंत कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करत आहेत. कोल्हापूरच्या कलापरंपरेला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्यात या दोन्ही कलावंतांचे योगदान महत्त्वाचे आहे. या प्रयत्नाला कोल्हापुरातील कलाकारांच्या वर्तुळात या दोन्ही कलावंतांचे अभिनंदन होत आहे.उद्घाटनाला हजारो रसिकांची उपस्थितीबुसानमध्ये झालेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला हजारो रसिकांनी उपस्थिती दर्शविली. आंगुक झेन सेंटरचे सेबुल सेईनम, टीव्हीएस मोटार कंपनी, कोरियाचे चेअरमन वेणू श्रीनिवासन यांची प्रमुख उपस्थिती होती. या भव्य समारंभासाठी आणि महोत्सव पाहण्यासाठी आलेल्या रसिकांमध्ये कलाप्रेमींशिवाय स्थानिक नागरिकही उपस्थित होते. भारत आणि कोरिया या दोन देशांतील कला संस्कृती आणि कलावंतांच्या विचारांचे आदानप्रदान करणे, हा या प्रदर्शनाचा हेतू आहे. जगभरातील जवळपास २00 हून अधिक कलावंतांच्या कलाकृती या प्रदर्शनात आहेत.

परदेशात भारतीय कलेला मिळालेला प्रतिसाद पाहून आनंदाने छाती भरून आली. दोन्ही देशांतील कलाकारांच्या कलाकृती आणि वेगवेगळ्या शैलीतील काम पाहण्याची संधी या प्रदर्शनामुळे मिळाली, याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो.संजीव संकपाळचित्रकार, कोल्हापूर.

 

टॅग्स :artकलाcultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर