शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चिल्लर पार्टीच्या ढोल वाजतोयच्या प्रयोगाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 19:21 IST

govindpansare, natak, kolhapurnews ढोल वाजतोय च्या प्रयोगाने सामाजिक भान सांगणाऱ्या एकांकिकेला चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमध्ये सहभागी असलेल्या सदस्यांनी मंगळवारी भरभरुन दाद दिली. फिनिक्स अ‍ॅक्टींग स्कूलच्या कलाकारांनी सादर केलेल्या या एकांकिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी या कलाकारांनी डॉ. धर्मवीर भारती यांच्या कविता सादर केल्या.

ठळक मुद्देचिल्लर पार्टीच्या ढोल वाजतोयच्या प्रयोगाला प्रतिसादकॉ. गोविंद पानसरे जयंती साजरी : फिनिक्सच्या कलाकारांना दाद

कोल्हापूर : ढोल वाजतोय च्या प्रयोगाने सामाजिक भान सांगणाऱ्या एकांकिकेला चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमध्ये सहभागी असलेल्या सदस्यांनी मंगळवारी भरभरुन दाद दिली. फिनिक्स अ‍ॅक्टींग स्कूलच्या कलाकारांनी सादर केलेल्या या एकांकिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी या कलाकारांनी डॉ. धर्मवीर भारती यांच्या कविता सादर केल्या.चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत केवळ हितचिंतकांसाठी कॉ. गोविंद पानसरे यांच्या जयंतीनिमित ह्यढोल वाजतोयह्ण ही एकांकिका आणि डॉ. धर्मवीर भारती यांच्या अंधा युग या हिंदी नाटकाच्या प्रस्तावनेचे सादरीकरण तसेच राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या रश्मीरथी या हिंदी काव्य संग्रहातील सर्ग सादर करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत स्टर्लिंग टॉवरजवळ प्राथमिक शिक्षक बँकेसमोरील फिनिक्स अ‍ॅक्टींग स्कूल येथे हा विचार करण्यास प्रवृत्त करणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला.ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर यांनी कॉ. गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प वाहून या कार्यक्रमास प्रारंभ केला. यावेळी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक संजय मोहिते, चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव, जेष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी, अभिनेत्री राजश्री खटावकर यांच्यासह फिनिक्सचे कलाकार उपस्थित होते.प्रारंभी डॉ. धर्मवीर भारती यांच्या ह्यअंधा युगह्ण या हिंदी नाटकातील प्रस्तावना तसेच राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या रश्मीरथी या काव्य संग्रहातील कृष्ण की दुर्योधन को चेतावणी हा सर्ग या कलाकारांनी सादर केले.यावेळी चिल्लर पार्टीने प्रकाशित केलेल्या सिनेमा पोरांचा हे पुस्तक देउन कलाकारांचा सत्कार करण्यात आला. चिल्लर पार्टीचे मिलिंद कोपर्डेकर यांनी प्रास्ताविक केले तर रविंद शिंदे यांनी आभार मानले.चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे लहान मुलांना, विशेषत: गरीब आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याच्या चौथ्या रविवारी जगातील उत्तमोत्तम सिनेमे विनामूल्य दाखविण्यात येतात. या उपक्रमाचे हे दहावे वर्ष आहे.ढोल वाजतोय या एकांकिकेचे दिग्दर्शन ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर यांनी केले आहे. निर्माते, दिग्दर्शक संजय मोहिते यांच्या फिनिक्स अ‍ॅक्टिंग स्कूलची निर्मिती असलेला विजय टाकळे लिखित या एकांकिकेचे लेखन विजय टाकळे यांनी केले आहे.

यामध्ये विजयंत शिंदे, मोहन गोजारे, जीवन पाटील, सौरभ कोरे, सुभाष बेबले, निखिल सिंग्री यांनी अभिनय केला आहे. याशिवाय असंग दीपंकर (संगीत), सचिन वाडकर (प्रकाश योजना), राकेश गाठ (सूत्रधार), विनायक कुंभार, अंकुश तिवारी, चिंतन पाटील (सहाय्यक) या फिनिक्सच्या कलाकारांचा यात सहभाग आहे. 

टॅग्स :Natakनाटकkolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरे