फोटो
रूकडी
लोकमत न्यूज नेटवर्क
रुकडी माणगाव :
लोकमत नातं रक्ताचं या उपक्रमातंर्गत रुकडी येथे झालेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. कोरोना महामारीची स्थिती असतानादेखील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिर यशस्वी करण्यासाठी जवाहर पतसंस्था व रुकडी ब्लड डोनर्सचे नियोजक कोमल पाटील, अमर आठवले यांनी विशेष परिश्रम घेतले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य पिंटू मुरूमकर, जवाहर पतसंस्थेचे अध्यक्ष सनतकुमार खोत, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, दिलीप इंगळे, लोकमतचे जाहिरात व्यवस्थापक राम जोशी, विक्रांत चव्हाण, ॲड. सुरेश पाटील, आरोग्यदूत मोहसीन मुल्ला, भगवान पोळ यांच्या हस्ते झाले. या शिबिरात वर्षा माने, श्वेता पाटील, स्वाती पाटील या महिलेने रक्तदान केले तर बांधकाम कामगार दीपक पोळ यांनी रक्दान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. विशेष म्हणजे येथील महावीर पाटील या खासगी वाहतूकदाराने रक्तदाब कमी असतानासुध्दा रक्तदान करणारच म्हणत रक्तदान केले. सह्याद्री विद्यानिकेतनचे सचिन बाबासाहेब आंबी यांनी पंचविसावेतर आरोग्य दूत मोहसीन मुल्ला यांनी पंधरावे रक्तदान केले. दिगबंर जैन समाजाचे अध्यक्ष रवींद्र डिग्रजे यांचे एकशे पंधरा किलो वजन असतानाही रक्तदान करण्याची तयारी दर्शविली. इम्रान नजीर फकीर यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून वाढदिवस साजरा केला.
यावेळी कोमल पाटील, अमर आठवले, सागर कोळी, सुदर्शन पाटील, बाळगोंडा पाटील , मोहसीन मुल्ला, बसगोंडा पाटील,हर्षवर्धन चिंचवाडे, सनतकुमार पाटील, सतीश खोत आदी उपस्थित होते.
चौकट
लोकमत नातं रक्ताचं या उपक्रमात रुकडी येथील शीतल पाटील (काका), पत्नी स्वाती पाटील, कन्या श्वेता पाटील या तिघांनी एकाच वेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
१० रुकडी रक्तदान शिबिर
फोटो : रुकडी येथे रक्तदान शिबिरप्रसंगी प्रमाणपत्र देताना डाॅ. सनतकुमार खोत, पिंटू मुरूमकर ,कोमल पाटील, राम जोशी, अमर आठवले, दिलीप इंगळे, विजय पाटिल, अड सुरेश पाटिल, मोहसीन मुल्ला उपस्थित होते.