शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

अभयारण्य, धरणग्रस्तांच्या वसाहतीचा प्रश्न मार्चअखेर सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 15:53 IST

Dam, Collcator, Kolhapurnews, mp, Member of parliament वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या वसाहतीचा व तेथील सोयी-सुविधांचा प्रश्न मार्चअखेर मार्गी लावा, अशी सूचना खासदार धैर्यशील माने यांनी केली.

ठळक मुद्देअभयारण्य, धरणग्रस्तांच्या वसाहतीचा प्रश्न मार्चअखेर सोडवापूर्नवसनसंबंधी बैठकीत सुचना : धैर्यशील माने

कोल्हापूर : वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या वसाहतीचा व तेथील सोयी-सुविधांचा प्रश्न मार्चअखेर मार्गी लावा, अशी सूचना खासदार धैर्यशील माने यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पुनर्वसन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे यांच्यासह शाहूवाडी, इचलकरंजी, राधानगरीचे प्रांताधिकारी, कार्यकारी अभियंता, वनअधिकारी उपस्थित होते. वारणा धरण व चांदोली प्रकल्पग्रस्तांनी खासदार माने यांच्याकडे पुनर्वसनासंबंधीचे तक्रार अर्ज दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.यावेळी खासदार माने म्हणाले, वारणा धरणग्रस्तांच्या वसाहती स्थापन होऊन ३५ वर्षे झाली तरी तेथे सुविधांची वानवा आहे. जमीन वाटपापासून वंचित असलेल्या ७०० ते ९०० खातेदारांना शिल्लक संपादन जमिनीचे वाटप करावे.

सांगलीप्रमाणे वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्तांना निर्वाह भत्ता, घरबांधणी व शौचालय अनुदानाचे वाटप केले जावे. धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीचा कालावधी ठरवून घ्या, त्यांच्या अडचणी जाणून घेत प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिबिरे घ्या, वारंवार बैठका घेऊन पुनर्वसनाच्या कामाचा आढावा घेण्यात यावा अशी सूचना केली.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूरDamधरणMember of parliamentखासदार