शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा संकल्प; तरुण मंडळांची २३ ला बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 18:06 IST

अनपेक्षित व दुर्दैवी अशा पूर परिस्थितीमुळे कोल्हापूरसह सांगलीवासीयांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. यात आपले बांधव अडचणीत असताना यंदाचा गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा केला पाहिजे. कमीत कमी खर्च करून उर्वरित निधी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला जावा, असा निर्णय मंगळवारी इंद्रप्रस्थ हॉल येथे झालेल्या राजारामपुरीतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्दे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा संकल्प; तरुण मंडळांची २३ ला बैठकराजारामपुरीतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : अनपेक्षित व दुर्दैवी अशा पूर परिस्थितीमुळे कोल्हापूरसह सांगलीवासीयांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. यात आपले बांधव अडचणीत असताना यंदाचा गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा केला पाहिजे. कमीत कमी खर्च करून उर्वरित निधी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला जावा, असा निर्णय मंगळवारी इंद्रप्रस्थ हॉल येथे झालेल्या राजारामपुरीतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.राजारामपुरी परिसरात गेले कित्येक वर्षांपासून विद्युत रोषणाई ते सजीव देखावे, असा भव्यदिव्य गणेशोत्सव साजरा केला जातो. यासह अनेक मंडळांच्या आरास व काल्पनिक मंदिरे यामुळे या परिसराची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रात आहे; त्यामुळे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक गणेशोत्सव काळात या ठिकाणी गणेशोत्सव पाहण्यासाठी येतात.

यंदा कोल्हापूरसह सांगली, सातारा या जिल्ह्यांत महापूर आल्याने आपले सर्व बांधव अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करणे उचित ठरणार नाही. विद्युत रोषणाई, देखावे यांवर खर्च केले जाणारे लाखो रुपये पूरग्रस्तांच्या मदतीला आले तर त्यांचे संसार पुन्हा उभारतील. या दृष्टीने राजारामपुरीतील १२९ मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची शुक्रवारी (दि. २३) ला बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात ठोस निर्णय जाहीर केला जाणार आहे. या बैठकीत प्रमुख कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी संजय जाधव (काका), कमलाकर जगदाळे, अनुप पाटील, संजय काटकर, बाबा इंदुलकर, राजू लिंग्रस, माजी नगरसेवक अनिल कदम, सुरेश डोणुक्षे, शेखर घोटणे, काका पाटील, लॉरी आॅपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, अमर हर्षे, मदन जाधव, किशोर खानविलकर, मयूर भोसले, अभिजित शिंदे, शैलेश जाधव, धैर्यशील साळोखे, ओंकार घाटगे, आदिनाथ चौगुले यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरGanpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर