शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती पदाधिकाऱ्यांचे राजीनामे लांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 14:27 IST

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींचे राजीनामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसंचालकांनी घेतली विनय कोरेंची भेट नोकर भरतीनंतरच बदल करण्यास कोरे आग्रही

कोल्हापूर : कोल्हापूरशेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींचे राजीनामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. संचालकांनी रविवारी आमदार विनय कोरे यांची भेट घेऊन नोकर भरतीसह राजीनाम्याबाबत चर्चा केली; पण नोकर भरतीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर राजीनाम्याबाबत विचार करू, असे कोरे यांनी सांगितल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.समितीचे सभापती बाबासो लाड व उपसभापती संगीता पाटील यांची मुदत एक महिन्यापूर्वीच संपली आहे. लाड व पाटील यांना दहा महिन्यांसाठी संधी देण्यात आली होती; पण विधानसभा निवडणूक असल्याने पदाधिकारी बदल लांबला. आता नव्याने बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून रविवारी सकाळी संचालकांनी आमदार कोरे यांची भेट घेतली.

संचालकांनी मार्च महिन्यात नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. लोकसभा निवडणूक असल्याने अर्ज मागवून प्रक्रिया स्थगित केली होती. विधानसभेच्या तोंडावर भरती करू नका, अशा सूचना आघाडीच्या नेत्यांनी दिल्या होता.तोपर्यंत मागील संचालकांनी भरती केलेल्या ३७ कर्मचाऱ्यांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला. त्यामुळे भरतीबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत संचालकांनी कोरे यांच्याकडे विचारणा केली. जुनी की नवीन घ्यायची, याबाबत आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासह आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करू, असे त्यांनी संचालकांना सांगितले.सभापती, उपसभापतींच्या राजीनाम्याबाबत काही संचालकांनी आमदार कोरे यांच्याकडे विचारणा केली. नोकर भरतीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर राजीनाम्याचा विचार करू, आपण आमदार सतेज पाटील यांच्याशी बोलतो, असे कोरे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूरagricultureशेतीVinay Koreविनय कोरे