शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

संशोधन हे प्रयोगशाळेपुरतेच मर्यादित नको

By admin | Updated: March 30, 2015 00:11 IST

अशोक भोईटे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे प्रशिक्षण शिबिर

कोल्हापूर : संशोधन हे प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. तुतीच्या शेतीवर कुठल्याही अनियमित हवामानाचा दुष्परिणाम होत नाही. तसेच या शेतीमध्ये कुठल्याही गोष्टी वाया जात नाहीत. अगदी तुतीच्या पानापासून ते रेशीमकिड्यांच्या विष्ठेपर्यंत सर्व गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर करता येतो. तसेच रेशीमधाग्याला बाजारपेठांमध्ये प्रचंड मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडे न वळता या प्रकाराच्या शेतीकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी केले. भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ फार्मसी, कोल्हापूर येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘तुतीच्या पानापासून औषधी गोळ्यांचे उत्पादन’ या विषयावर आधारित मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठ, पुणेचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम होते. प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठ प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. डी. जाधव, शिवाजी विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापनाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ए. एम. गुरव यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे मुख्य समन्वयक डॉ. एन. आर. जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. डी. ए. भागवत यांनी सूत्रसंचालन केले. सहसमन्वयक प्रा. यू. एस. पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटिया यांच्यासह प्रशिक्षण शिबिरासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, आदी जिल्ह्यांतील २००हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)