शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील ‘कोरोना’च्या ४ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह; बसमधून उतरवून केली तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:35 IST

कोल्हापूर : येथून पुण्याला पाठविण्यात आलेल्या चार कोरोना संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. यामध्ये येथील ...

कोल्हापूर : येथून पुण्याला पाठविण्यात आलेल्या चार कोरोना संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. यामध्ये येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील वरिष्ठ महिला डॉक्टरांचाही समावेश आहे. 

आतापर्यंत कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये ५६ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यातील बहुतांशी नागरिक दुबईहून आले होते. गुरुवारी दुपारपर्यंत तिघांच्या घशातील स्राव तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. तर गुरुवारी संध्याकाळी या रुग्णालयातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनाही त्रास जाणवू लागल्याने त्यांचाच घशातील स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, या चौघांच्याही स्रावाचा अहवाल नकारात्मक आल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. सीपीआर प्रशासनाने इचलकरंजी आणि उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथेही अशा संशयितांसाठी विशेष व्यवस्था केली असून, शहरातील खासगी इस्पितळांमध्येही सुविधा निर्माण केल्या जात आहेत. बसमधून उतरवून केली तपासणीकोल्हापूरहून गारगोटीकडे जाणाºया एका प्रवाशाला एसटी बस मध्येच थांबवून तपासणीसाठी आणल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी कोल्हापुरात घडला. कोल्हापूर-गारगोटी बसमधून प्रवास करणारा एक प्रवासी दुबईहून आला होता. त्याने मास्क घातला होता. ते पाहून प्रवाशांनी चौकशी केली. तो दुबईहून आल्याचे समजताच ही माहिती प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर मध्येच गाडी थांबवून या प्रवाशाला रुग्णालयात आणून त्याची तपासणी करण्यात आली. आपली याआधी मुंबई विमानतळावर तपासणी झाली असल्याचे त्याने सांगितल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. .....................................समीर देशपांडे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल