शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

महालक्ष्मी, हरिप्रिया एक्सप्रेसचा प्रवास आता आरामदायी होणार, येत्या गुरुवारपासून नव्या एलएचबी कोचसह धावणार  

By संदीप आडनाईक | Updated: January 23, 2024 18:15 IST

प्लॅटफॉर्मवर जाण्यास आता लिफ्ट

कोल्हापूर : कोल्हापूरहून मुंबईकडे आणि तिरुपतीला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसचे आणि तिरुपती-कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेसचे सर्व जुने आयसीएफ कोच बदलून आता नवीन एलएचबी कोच जोडण्यात आले आहेत. उद्या, गुरुवारपासून प्रवासी या नवीन कोचमधून आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा आनंद घेणार आहेत.कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस आणि तिरुपती-कोल्हापूर- तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेसमधून व्यवसाय, शिक्षण तसेच पर्यटनासाठी रोज हजारो प्रवासी या रेल्वेमधून प्रवास करतात. मध्य रेल्वेने या रेल्वेला लावलेले जुने आणि पारंपरिक आयसीएफ कोच आता बदलले आहेत. तिरुपती-कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक १७४१५/१७४१६) आज, दिनांक २४ जानेवारीपासून तिरुपतीहून आणि २७ जानेवारीपासून कोल्हापूरपासून तसेच कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर (ट्रेन क्रमांक १७४११/१७४१२) महालक्ष्मी एक्सप्रेसचे २३ कोच उद्या, गुरूवार, दि. २५ जानेवारी रोजी रात्रीपासून पारंपारिकऐवजी एलएचबी कोचसह धावणार आहेत. ही गाडी रोज कोल्हापूर येथून रात्री ८.५० वाजता सुटते. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उद्या गुरुवारी रात्री ७.३० वाजता हा विशेष समारंभ होत आहे.

लिफ्ट बिल्डचे उद्या उदघाटनयाशिवाय प्रवाशांसाठी विविध प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठीच्या लिफ्ट बिल्डचे उदघाटन उद्या रात्री खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते होणार आहे. 

रेल्वेचे महाव्यवस्थापक उद्या कोल्हापुरातदरम्यान, अमृत योजनेतील रेल्वेस्थानक पुनर्विकास कामाची पाहणीसाठी उद्या, बुधवारी सकाळी ७.३० वाजता रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्यासोबत विभागीय व्यवस्थापक इंदुरानी दुबे,  वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक मिलिंद हिरवे, जनसंपर्क अधिकारी रामपाल बडबग्गा, रेल्वेचे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी आदी उपस्थित राहणार आहेत.

हे आहे नव्या कोचचे वैशिष्ट्यवजनाला हलके आणि जास्त आसन क्षमता तसेच स्वच्छ स्वच्छतागृहे असलेले हे नवीन एलएचबी कोच लावण्यात आल्याने रेल्वेला आणखी गती मिळणार आहे. या दोन्ही गाड्यांना मोठ्या प्रमाणात पर्यटक, भाविक आणि प्रवाशांचा प्रतिसाद आहे. गेल्या काही वर्षापासून या गाडीचे जुने कोच बदलून नवीन कोच बसवण्यात यावे अशी मागणी मध्य रेल्वेकडे प्रवासी संघटनांकडून करण्यात येत होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे