शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जुनी मशिनरी बदला, इथेनॉल, वीजनिर्मिती करा:  हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:18 IST

Sugar factory , Hasan Mushrif, kolhapur चाळीस वर्षापूर्वीची मशिनरी जुनी झाली आहे. ती बदलण्याबरोबरच इथेनॉल व सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू करा, अन्यथा शेतकरी-कामगारांसह कारखान्याचे भवितव्यही अंधकारमय आहे, असा सल्ला वजा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज, गडहिंग्लज कारखान्याच्या संचालकांना दिला.

ठळक मुद्दे जुनी मशिनरी बदला, इथेनॉल, वीजनिर्मिती करा:  हसन मुश्रीफ गडहिंग्लजच्या संचालकांना आवाहन, गळीत हंगामास प्रारंभ

गडहिंग्लज :चाळीस वर्षापूर्वीची मशिनरी जुनी झाली आहे. ती बदलण्याबरोबरच इथेनॉल व सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू करा, अन्यथा शेतकरी-कामगारांसह कारखान्याचे भवितव्यही अंधकारमय आहे, असा सल्ला वजा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज, गडहिंग्लज कारखान्याच्या संचालकांना दिला.ब्रिसक् फॅसिलिटीज कंपनीतर्फे चालविण्यात येणाऱ्या आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी मुश्रीफांनी पत्रकारांशी संवाद साधला. यंदाच्या ५ लाख मे. टन गाळपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.मुश्रीफ म्हणाले, कराराप्रमाणे कंपनीची आणखी तीन वर्षे शिल्लक आहेत. त्यानंतर कारखाना सोडून जाण्यास कंपनी तयार आहे. परंतु, जुन्या मशिनरीमुळे गाळपात वारंवार व्यत्यय येतो. त्यामुळे संचालकांनी वेळीच योग्य निर्णय घ्यावा.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, संचालक सतीश पाटील, बाळकृष्ण परीट, सरव्यवस्थापक वसंत गुजर, प्रशासन अधिकारी शाम हरळीकर उपस्थित होते.

मोदी-शहाना भेटावेकेंद्राने बफर स्टॉक बंद केल्यामुळे साखर गोदामात पडून आहे. निर्यातीचे अनुदानही मिळालेले नाही. एफआरपी वाढली, मात्र महागाई वाढीच्या भितीपोटी केंद्राने खुल्या बाजारातील साखरेचे भाव वाढवलेले नाहीत. त्यामुळे सर्वच कारखाने अडचणीत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारसाहेबांना घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांना भेटावे, असे आवाहनही मुश्रीफांनी यावेळी केले.

आंदोलनाची दिशा बदलाकेवळ कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानेच एकरकमी एफआरपी देतात. सांगली-साताऱ्यात ती दोन-तीन टप्यात दिली जाते. इतर जिल्ह्यातील परिस्थिती त्याहून वेगळी आहे. तरीदेखील एफआरपीसाठीची आंदोलने फक्त कोल्हापूरातच का होतात, हे न सुटलेले कोडे आहे. एफआरपी कायद्यानेच बंधनकारक असताना त्यासाठी आंदोलने का ? आता आंदोलनाचीही दिशा बदलायला हवी, अशी अपेक्षा मुश्रीफांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर