शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शक्य तेवढे अडथळे दूर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:56 IST

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत मानवनिर्मित अडथळ्यांमुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे येत्या आठ तारखेपासून सुरू होणाºया किरणोत्सवापूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने व महापालिकेच्या सहकार्याने शक्य तितके अडथळे दूर करण्यात येणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी ...

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत मानवनिर्मित अडथळ्यांमुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे येत्या आठ तारखेपासून सुरू होणाºया किरणोत्सवापूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने व महापालिकेच्या सहकार्याने शक्य तितके अडथळे दूर करण्यात येणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. किरणोत्सवाचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.येत्या आठ तारखेपासून अंबाबाईच्या किरणोत्सवास प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य सुभाष वोरा, प्रमोद पाटील, शिवाजीराव जाधव, संगीता खाडे, सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव, प्रशांत गवळी उपस्थित होते.महेश जाधव म्हणाले, यापूर्वी ‘केआयटी’चे प्रा. किशोर हिरासकर, विवेकानंद महाविद्यालयाचे मिलिंद कारंजकर यांच्यासह विविध अभ्यासकांनी अंबाबाईचा वर्षातून दोन वेळा होणारा किरणोत्सव आणि त्यात येणारे अडथळे यांचा अभ्यास केला आहे. किरणोत्सवासाठी महाद्वार ते संध्यामठ आणि रंकाळ्याचा पुढील काही भाग ‘नो डेव्हलपमेंट झोन’ जाहीर करावा लागणार आहे. त्याचा डिजिटल नकाशाच्या आधारे अभ्यास करून किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांचा तांत्रिकदृष्ट्या शास्त्रशुद्ध अभ्यास करावा लागणार आहे. त्यासाठी अभ्यास समिती स्थापन्यात आली आहे. या अभ्यासकांच्या अहवालानंतर देवस्थान समितीच्या वतीने महापालिकेला हा परिसर ‘नो डेव्हलपमेंट झोन’ जाहीर करण्यासाठी ठराव करण्यात यावा, अशी मागणी केली जाईल. महापालिकेत ठराव झाला की तो शासनाला पाठविला जाईल. मात्र या सगळ्या प्रक्रियेला काही कालावधी लागणार आहे. तोपर्यंत येत्या आठ दिवसांत देवस्थान व महापालिकेला असलेल्या अधिकारात किरणोत्सव मार्गातील अधिकाधिक अडथळे काढले जातील. मानवनिर्मित अडथळ्यांव्यतिरिक्त हवेतील प्रदूषण, सूर्यकिरणांची तीव्रता कमी असणे अशा कारणांमुळे किरणोत्सव होऊ शकला नाही तर त्याला पर्याय नाही. मंदिराबाहेरील भाविकांनाही किरणोत्सवाचा लाभ घेता यावा, यासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे.समितीत लोकप्रतिनिधींचा सहभाग असावाया पत्रकार परिषदेनंतर नगरसेवक व श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी देवस्थान समितीकडे किरणोत्सवाच्या अभ्यासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझा समावेश करावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समितीने यापूर्वी केलेल्या पाहणीनुसार काही इमारती किरणोत्सवात अडथळा आहेत; तसेच या मार्गात ‘नो डेव्हलपमेंट झोन’ करण्याचे प्रस्तावित आहे. किरणोत्सव मार्गातील बहुतेक इमारती या मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या प्रभागातील आहेत. समितीने आजवर या प्रभागाचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी किंवा नागरिकांना विश्वासात न घेता अभ्यास केल्याचे दिसते; त्यामुळे या प्रकरणात बाधित होणाºया भागाचा प्रतिनिधी म्हणून माझा समितीत समावेश करण्यात यावा.

टॅग्स :Templeमंदिर