शहरं
Join us  
Trending Stories
1
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
2
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
3
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
4
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
5
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
6
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
7
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
8
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
9
नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...
10
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
11
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
12
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
13
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
14
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
15
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
16
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
17
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
18
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
19
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
20
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे

आंदोलनाच्या रेट्याने स्थलांतर लांबले

By admin | Updated: April 7, 2015 01:24 IST

कृती समितीचा ठिय्या : शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयास राजारामपुरी शाळा क्र.९ चे मैदान न देण्यावर ठाम

कोल्हापूर : राजारामपुरीतील राजाराम विद्यालय व छत्रपती विजयमाला कन्या शाळेसमोरील (शाळा क्र. ९) खेळाचे मैदान शहर पोलीस वाहतूक शाखेला कोणत्याही स्थितीत न देण्यास येथील नागरिक ठाम आहेत. सोमवारी सकाळी मैदान बचाव सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या दारात जोरदार निदर्शने करीत प्रशासन विरोधी घोषणा दिल्या. त्यामुळे सोमवारी या ठिकाणी होणारे शहर वाहतूक शाखेचे स्थलांतर करण्याचे धाडस झाले नाही.दरम्यान, नागरिकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना निवेदन देऊन वाहतूक शाखेला इतरत्र जागा देण्याची विनंती कार्यकर्त्यांनी केली. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. आयुक्तांच्या उत्तराने समाधान न झाल्याने कार्यकर्त्यांनी मैदानासाठी यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.राजारामपुरी, दौलतनगर, जागृतीनगर, शाहूनगर, शाहू मिल कॉलनी या परिसरातील मुलांना खेळण्यासाठी शाळा क्र.९ हे एकमेव मैदान आहे. येथील एक शाळा बंद अवस्थेत आहे. या शाळेच्या तीन खोल्या शहर पोलीस वाहतूक शाखेला देण्याचा महापालिकेच्या स्थायी समितीने ठराव मंजूर केला. नागरिकांनी यापूर्वीही शाळेचे मैदान वाचविण्यासाठी आंदोलन केले. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत छत्रपती विजयमाला विद्यालय हे नाव खोडून त्या जागी कार्यालयाचे नाव लिहिले. यानंतर मैदान बचाव कृती समितीच्या वाहतूक शाखेचा फलक रविवारी खोडून काढला. शहर वाहतूक शाखेचे स्थलांतर सोमवारी सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती समजल्याने सकाळी साडेनऊपासून परिसरातील कार्यकर्ते शाळेजवळ जमले. मात्र, वाहतूक शाखेने आंदोलकांच्या धास्तीने स्थलांतर पुढे ढकलले. शाळेच्या विद्यार्थ्यांसह आंदोलकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा करून निषेध नोंदविला. यानंतर कार्यकर्त्यांनी मोर्चा महापालिकेत आयुक्तांच्या दालनाकडे वळविला.सुमारे अर्धा तास आयुक्तांशी कार्यकर्त्यांनी जागेबाबत हुज्जत घातली. पोलीस प्रशासनाला दुसरी जागा देण्याबाबत पोलीस अधीक्षकांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी ठामपणे बजावले. वाहतूक शाखेच्या कार्यालयाची येथील नियोजित जागा न बदलल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी शिक्षण समिती सभापती संजय मोहिते, नगरसेवक मुरलीधर जाधव, वसंत कोगेकर, राजू पसारे, बाबा इंदुलकर, दुर्गेश लिंग्रस, काका पाटील, कमलाकर जगदाळे, आदी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)१ सध्या या मैदानावर मुलांच्या खेळापेक्षा परिसरातील अवजड वाहने तसेच व्यापाऱ्यांची वाहने लावण्यासाठी वापर होतो. कृती समितीने मैदान वाचवून ते निव्वळ पार्किंगसाठी खुले करू न देता मुलांना खेळासाठीही याचा वापर व्हावा, यासाठीही प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. २शाळेच्या तीन खोल्या वाहतूक शाखेला देण्यासाठी दहा लाख रुपये खर्च केले आहेत. आता आंदोलनामुळे इतरत्र कार्यालय हलविणे शक्य होणार नाही, असा मनपा प्रशासनाचा सूर आहे. शाळेचे मैदान बंदिस्त करून कायमस्वरूपी विद्यार्थ्यांच्या खेळासाठी खुले ठेवण्याच्या अटीवर महापालिका व पोलीस प्रशासन आंदोलकांशी चर्चेद्वारे तोडगा काढण्याची शक्यता आहे.शहरात वाहतुक ीला शिस्त लावण्यासाठी महापालिकेने पोलीस प्रशासनाला सोयी व सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून वाहतूक शाखेच्या नवीन जागेबाबत निर्णय घेतला जाईल.- पी. शिवशंकर, आयुक्त