शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी पुलाच्या कामावरून आबदार यांना हटवा, कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 17:11 IST

पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामात अडथळा आणणारे उपअभियंता संपत आबदार यांना त्या कामावरून हटवा; अन्यथा त्यांना पुलावर आल्यास चोप देऊ; यावेळी बिघडणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा गुरुवारी दुपारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिला. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात शिष्टमंडळाने काहीवेळ गोंधळ माजविला. याप्रसंगी आबदार यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

ठळक मुद्देशिवाजी पुलाच्या कामावरून आबदार यांना हटवा, कारवाई कराकृती समितीचा कार्यकारी अभियंत्यांना घेराव : पुलावर आल्यास चोप देण्याचा इशारा

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामात अडथळा आणणारे उपअभियंता संपत आबदार यांना त्या कामावरून हटवा; अन्यथा त्यांना पुलावर आल्यास चोप देऊ; यावेळी बिघडणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा गुरुवारी दुपारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिला. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात शिष्टमंडळाने काहीवेळ गोंधळ माजविला. याप्रसंगी आबदार यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.बैठकीस बोलावूनही उपस्थित न राहता उद्धटपणाची भाषा वापरणारे उपअभियंता आबदार यांच्यावर कारवाईची लेखी शिफारस कांडगावे यांनी मुंबईतील मुख्य अभियंता विनय देशपांडे यांच्याकडे केली.पुलाच्या कामात अधिकाऱ्यांतील अंतर्गत वादामुळे अडथळे येत आहेत. उपअभियंता संपत आबदार यांनी ठेकेदाराच्या बिलांमध्ये दुरुस्ती करून ९० लाखांचे बिल फक्त नऊ लाख केले. त्यामुळे ठेकेदारांनी काम बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला. कृती समितीचे शिष्टमंडळ गुरुवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता आबदार यांच्या कार्यालयात गेले; पण आबदार हे कार्यालयात नसल्याने, कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घातला.

आबदार यांच्यावर कारवाई करीपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याचा त्यांनी पवित्रा घेतला. काहींनी मुख्य अभियंता देशपांडे यांना फोन करून आबदार यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार केली. गोंधळातच आबदार यांच्या कार्यपद्धतीबाबत व त्यांना पुलाच्या कामावरून हटविण्याबाबत वरिष्ठांकडे तक्रारीचे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता कांडगावे यांनी कृती समिती शिष्टमंडळास दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले.आंदोलनात, कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, सहनिमंत्रक बाबा पार्टे, अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत यादव, संभाजीराव जगदाळे, अशोक भंडारे, विजयसिंह पाटील, स्वप्निल पार्टे, दिलीप माने, सतीशचंद्र कांबळे, जहिदा मुजावर, शीतल तिवडे, माई वाडेकर, सुमन वाडेकर, सुनीता राऊत, मीरा मोरे, मंगल कट्टी, आदी सहभागी झाले होते.

‘येत नाही; काय करायची ती कारवाई करा!’दरम्यान, शिष्टमंडळाशी चर्चा सुरू असताना कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी उपअभियंता संपत आबदार यांना फोन करून चर्चेसाठी येण्यास सांगितले. त्यावेळी आबदार यांनी, ‘येत नाही, काय कारवाई करायची ती करा!’ अशी उद्धट भाषा वापरून फोन बंद केला. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी आबदार यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

कृती समिती शुक्रवारी पुलावरउपअभियंता आबदार यांना पुलाच्या कामावरून हटवून ते काम कार्यकारी अभियंता कांडगावे यांनी पाहावे यासाठी कृती समितीचे कार्यकर्ते शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता शिवाजी पुलावर एकत्र येऊन निदर्शने करणार आहेत, असे यावेळी जाहीर करण्यात आले. 

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर