शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग सुरू न केलेल्या उद्योजकांचे भूखंड काढून घ्या

By admin | Updated: November 3, 2014 23:32 IST

गडहिंग्लज ‘एमआयडीसी’ : शिवसेनेची मागणी, प्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन

गडहिंग्लज : विहित मुदतीत उद्योग सुरू न केलेल्यांचे भूखंड काढून घ्या आणि ते नवीन उद्योजकांना द्या, एकाच भांडवलदाराला मोठा भूखंड देण्यापेक्षा लहान उद्योजकाला प्राधान्याने भूखंड द्या, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे शिवसेनेतर्फे निवेदनातून करण्यात आली.‘लोकमत’ने ३१ आॅक्टोबरच्या अंकात गडहिंग्लज तालुक्यातील रेंगाळलेले प्रश्न व नव्या सरकारकडून तालुक्याच्या अपेक्षांसह गडहिंग्लजच्या एमआयडीसीत ग्रेमॅक कंपनीच्या नियोजित कारखान्यासह उद्योगधंदेच सुरू न झाल्यामुळेच औद्योगिकरण रखडले आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला ब्रेक लागल्याचे रोखठोक मांडले. या वृत्ताचे पडसाद म्हणून शिवसेनेतर्फे हे निवेदन देण्यात आले.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेटून संबंधित अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने यांचा समावेश होता.निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज ‘एमआयडीसी’साठी १३२.४२ हेक्टर जागा शासनाने संपादित केली आहे. त्यामध्ये औद्योगिक, व्यापारी, निवासी व इतर मिळून १२५ भूखंड आरेखित करण्यात आले. ७० औद्योगिक व दोन व्यापारी असे मिळून ७२ भूखंड वाटण्यात आले. एकूण भूखंडापैकी २८ औद्योगिक, १४ व्यापारी व ११ इतर मिळून ५३ भूखंड शिल्लक आहेत. व्यापारी २ व ६५ औद्योगिक भूखंड रिकामे आहेत. तीन औद्योगिक भूखंड काढून घेण्यात आले असून, १५ औद्योगिक भूखंडधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.ग्रेमॅक इन्स्फास्ट्रक्चर लि., कंपनीला सर्वांत मोठी जागा देण्यात आली असून, ती जागा न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे. सध्या काळभैरव अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजची राईस मिल वगळता एकही उद्योग याठिकाणी सुरू नाही. अनेक उद्योजकांनी भूखंड घेऊनदेखील ती विकसित केलेली नाहीत. त्यामुळे गडहिंग्लज औद्योगिक क्षेत्राची प्रगती झालेली नाही.जाहीर निविदा काढून शिल्लक भूखंड नवीन उद्योजकांना देऊन रोजगार वाढीसाठी प्रयत्न करावेत, ज्यांनी उद्योग सुरू केलेले नाहीत ते भूखंड ताब्यात घेऊन नवीन उद्योजकांना द्यावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.निवदेनावर, सागर कुराडे, दयानंद पाटील, अमर रणदिवे, प्रकाश कोलते, बसवराज स्वामी, सदाशिव चिलमी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)भूखंडधारकांना नोटिसा बजावणारगडहिंग्लज एमआयडीसीत ज्या भूखंडधारकांनी इमारत पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नाही व ज्या भूखंडधारकांचे भूखंड विकसित करण्याची मुदत संपलेली आहे, अशा भूखंडधारकांना भूखंड विकसित न केल्याबद्दल ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून महामंडळाच्या नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल. शिल्लक भूखंड नवीन उद्योजकांना देण्यासंदर्भात निविदा काढण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात येईल, असे लेखी पत्र अधिकाऱ्यांनी शिवसेनेला दिले आहे.