शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणे २४ जूनपर्यंत काढून घ्या - महेश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:53 IST

अंबाबाई मंदिरातील ओवऱ्यांवरील दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोरील पत्र्याच्या शेड २४ जूनपर्यंत काढून घ्याव्यात; अन्यथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे अशा दुकानांसमोरील पत्रे काढले जातील; याशिवाय कारवाईही केली जाईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिला.

ठळक मुद्दे‘लोकमत’ने यासंदर्भातील वृत्त गुरुवारी दिले होते व समिती अतिक्रमणे कधी हटवणार अशी विचारणा केली होती. त्यानुसार समितीने तातडीने ही बैठक घेतली.

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील ओवऱ्यांवरील दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोरील पत्र्याच्या शेड २४ जूनपर्यंत काढून घ्याव्यात; अन्यथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे अशा दुकानांसमोरील पत्रे काढले जातील; याशिवाय कारवाईही केली जाईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिला. ‘लोकमत’ने यासंदर्भातील वृत्त गुरुवारी दिले होते व समिती अतिक्रमणे कधी हटवणार अशी विचारणा केली होती. त्यानुसार समितीने तातडीने ही बैठक घेतली.

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात ओवऱ्यांवरील दुकानदार व देवस्थान समिती पदाधिकारी, अधिकारी यांच्यात अतिक्रमणांसंबंधी गुरुवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जाधव म्हणाले, वर्षानुवर्षे ओवºयांवरील दुकानदार येथे व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे देवस्थान समिती व आपल्यामध्ये सुसंवाद असू दे. आपले पिढ्यान्पिढ्यांचे संबंध आहेत. कटुता येईल असे वर्तन करू नका. देवस्थान ही सरकारची मालकी आहे. त्यामुळे साहजिकच येथील सर्व कारभार शासनामार्फत होत आहे. अनेकदा परगावांहून येणाºया भाविकांना अडचण होईल असे वर्तन केले जाते.

यात अनेकदा भाविकांची फसवणूकही होते. अनेक दुकानदारांनी आपल्या ताब्यात असलेल्या दुकानाबाहेर येऊन पत्र्याचे शेड मारले आहे. त्यामुळे भाविकांना ये-जा करण्यास अडचण होत आहे. ही पत्र्याची शेड दुकानदारांनी येत्या २४ जूनपर्यंत स्वत:हून काढून घ्यावीत; अन्यथा देवस्थान समिती ती काढेल. त्याशिवाय जी कारवाई होईल, त्यास सामोरे जावे लागेल. मंदिराच्या आवारात प्रथम भाविकांची सोय पाहिली जाईल. यावेळी देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, व्यवस्थापक धनाजी जाधव व दुकानदारांतर्फे शीतल मेळवंकी, वृषाली सासने, विश्वनाथ मेवेकरी, भारती जाधव-मेवेकरी, अमित जाधव, श्रीकांत खत्री, सुजय खांडके, सुयोग खटावकर, आदी उपस्थित होते.देवीला वाहिलेल्या दागिन्यांतही खोटकरवीरनिवासिनी अंबाबाई देवीला राज्यासह परराज्यांतून येणाºया भाविकांपैकी अनेक भाविकांनी वाहिलेले सोन्याचे दागिने बेंटेक्सचे, तर चांदीची जोडवीही व्हाईट मेटलची असल्याचे दिसून आले. देणगी पेटीतून या दागिन्यांची मोजदाद करताना अनेकदा खोटेच दागिने आढळल्याने अनेकदा तपासणारा सोनारही कंटाळतो, असेही मत एका ज्येष्ठ सदस्याने अनौपचारिक गप्पा मारताना व्यक्त केले. 

सूचना अशाप्रसादाचे दुकान असल्यामुळे ते शटरपासून दिसू दे.देवीला वाहण्यात येणारी साडी सहावार असू दे. ती जर तीनवार आढळली, तर अशी दुकाने तत्काळ सील करून्यायालयात जाण्याची भाषा केल्यास, चोख प्रत्युत्तर देऊचुकीची प्रथा, अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही.इमिटेशन ज्वेलरीची दुकाने लवकरात लवकर बंद करावीत.गरुड मंडपालगतचे लॉटरी सेंटर २० जूनपर्यंत हलवावे.

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर